Samruddhi Accident :…तर 12 जणांचे वाचले असते प्राण; RTO अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

vaijapur police arrested two rto office and truck driver in samruddhi mahamarg accident case.
vaijapur police arrested two rto office and truck driver in samruddhi mahamarg accident case.
social share
google news

Samruddhi Accident Marathi news : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर एका भीषण अपघातात १२ भाविकांना जीव गमवावा लागला. या अपघाताआधीचा एक व्हिडीओ समोर आला असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह तिघांना अटक केलीये. आरटीओ अधिकारीच या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला असून, जर ट्रक रस्त्यावर थांबवला नसता, तर १२ जणांचे प्राण वाचले असते, असं म्हटलं जात आहे. (samruddhi mahamarg accident news today marathi)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका हद्दीत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला. 15 ऑक्टोबरच्या रात्री १.३० वाजता जांभरगाव टोलनाक्याजवळ ही घटना घडली. यात १२ जणांचा मृत्यू झाला. हे सगळे नाशिक जिल्ह्यातील होते आणि बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथून दर्शन घेऊन परतत होते. रस्त्यातच त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीला अपघात झाला.

अपघाताआधीचा व्हिडीओ आला समोर

समृद्धी महामार्गावरून जात असताना टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यानंतर गाडीचा चुराडा झाला. दरम्यान, ज्या ट्रकवर ही गाडी धडकली. त्याचा पाठलाग आरटीओची गाडी करत असल्याची माहिती समोर आली. एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक रस्त्यातवरच थांबवला असल्याचे दिसत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘दादा’ म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मी म्हणाले देणार नाही; मीरा बोरवणकरांचा गौप्यस्फोट

वाहनांची ये-जा सुरू असताना आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यातच ट्रक थांबवला आणि बाजूला बोलवून चालकाची चौकशी करत आहेत. त्याचवेळी मागून आलेला टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकवर येऊ धकडली आणि १२ जणांना प्राण गमवावे लागले.

दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

दरम्यान, वैजापूर पोलीस ठाण्यात या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक मनीष काळवानिया यांनी सांगितलं की, “अपघातात मृत्यू झालेल्यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे दिले गेले. टेम्पो ट्रॅव्हलरमधून प्रवास करत असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शरद पवारांच्या निकटवर्तीय माजी खासदारावर EDची मोठी कारवाई, 315 कोटींची संपत्ती जप्त

“पोलिसांनी तपास सुरू केला असून, यात तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक ट्रकचालक आहे, तर दोन आरटीओ अधिकारी आहेत”, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT