Kerala Blast : टिफिनमध्ये होता बॉम्ब! वायर-बॅटरी… एर्नाकुलममध्ये काय घडलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

ernakulam bomb blast : Kerala was shaken by three consecutive blasts one after the other on Sunday morning.
ernakulam bomb blast : Kerala was shaken by three consecutive blasts one after the other on Sunday morning.
social share
google news

Kerala Ernakulam Bomb Blast : रविवारी सकाळी एकापाठोपाठ तीन बॉम्बस्फोटांनी केरळ हादरले. केरळमधील एर्नाकुलम येथे एका ख्रिश्चन प्रार्थना सभेत तीन स्फोट झाले, ज्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे स्फोट करण्यात आले.

पोलिसांना घटनास्थळी स्फोटात वापरलेल्या तारा, बॅटरी आणि इतर संशयास्पद वस्तूही सापडल्या आहेत. हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

NSG दिल्लीहून रवाना

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्लीहून एनएसजी बॉम्बशोधक पथकही केरळला रवाना करण्यात आले आहे. एनएसजीच्या या टीममध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे जे घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या स्फोटानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सगळीकडे फक्त आग आणि धूर दिसत आहे. हा स्फोट कसा झाला आणि कोणी घडवला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशीही चर्चा केली आहे.

हे ही वाचा >> Surat : ‘मेल्यानंतर कुणाला…’, कुटुंबातील 7 जणांची मृत्युला मिठी, सुसाईड नोटमध्ये काय?

पिनराई विजय सध्या दिल्लीत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनात सहभागी होण्यासाठी विजयन दिल्लीत आले असून, त्यांच्या राज्यात हा स्फोट झाला. डाव्या पक्षाने हे आंदोलन आयोजित केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सकाळी साडेनऊ वाजता झाला स्फोट

या स्फोटाबाबत केरळचे डीजीपी डॉ. शेख दरवेश म्हणाले, ‘आज सकाळी 9.40 च्या सुमारास झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये स्फोट झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 36 जणांवर उपचार सुरू आहेत.’

हे ही वाचा >> Video : जन्म देणाऱ्या आईचे जनावरासारखे हाल! गळा दाबला, डोकं आपटलं अन्…

ते म्हणाले, ‘कन्व्हेंशन सेंटरमध्ये प्रादेशिक परिषद होत होती. आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. अतिरिक्त डीजीपीही मार्गावर आहेत. मीही लवकरच घटनास्थळी पोहोचेन. आम्ही सखोल तपास करत आहोत, यामागे कोण आहेत ते शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करू’, असे त्यांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणेने जारी केला होता अलर्ट

इस्रायल-पॅलेस्टाईनबाबत गुप्तचर यंत्रणांनीही एक महत्त्वाचा इशारा जारी केला होता. भारतातील ज्यूंची ठिकाणे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकतात, असा उल्लेख करण्यात आला होता. इतकंच नाही तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकत्याच अटक केलेल्या दोन इसिस दहशतवाद्यांनी मुंबईतील चावर्ड हाऊसमधील महत्त्वाच्या ज्यूंच्या जागेचा शोध घेतला होता आणि तेथील व्हिडिओ परदेशी दहशतवाद्यांना पाठवले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT