Gautami Patil Video : गौतमीच्या चाहत्यांचा धुडगूस, पत्रकारांना मारहाण
डान्सर गौतमी पाटीलचा नाशिक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काहीजणांनी गोंधळ घातला. दोन पत्रकारांनाही गोंधळ घालणाऱ्यांनी मारहाण केली.
ADVERTISEMENT
Gautami Patil News : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि वाद हे आता नेहमीचच समीकरण झालं आहे. गौतमीचा जिथे कार्यक्रमत होतो, तिथे काही काही वाद होतोच… याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीच्या मद्यधुंद चाहत्यांनी राडा केला. इतकंच नाही, तर यात दोन पत्रकारांनाही मारहाण केली.
ADVERTISEMENT
नाशिकमधील ठक्कर डोम येथे गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवनिर्माण सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी 300 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत तिकीट दर निश्चित करण्यात आले होते.
तिकीट दर, चाहत्यांचा हिरमोड आणि रिकाम्या खुर्च्या
जिथे कुठे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होतो, तिथे तुडूंब गर्दी असतेच. गौतमीचा डान्स लोक घरांच्या छतावर, झाडांवर बसून बघत असल्याचे व्हिडीओ अनेकदा बघायला मिळतात. पण, नाशिकमधील गौतमीच्या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवल्याचं दिसलं.
हे वाचलं का?
हेही वाचा >> पुणे जिल्ह्याचं विभाजन केल्यास कुणाचा फायदा? महेश लांडगेंच्या मागणीला अमोल कोल्हेंचा का विरोध?
आयोजकांनी तिकीट दर जास्त ठेवल्याने लोकांनी कार्यक्रमाला न जाणेच पसंत केले. तिकीट दरामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आणि त्यामुळे शेकडो खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत गौतमीला कार्यक्रम उरकावा लागला.
गौतमीच्या चाहत्यांनी का केला राडा?
दरम्यान, प्रेक्षकांची संख्या कमी असूनही गौतमीच्या या कार्यक्रमातही राडा झालाच. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांपैकी काहीजण मद्यप्राशन करून आले होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
ADVERTISEMENT
त्यांची हुल्लडबाजी सुरु झाल्यानंतर इतरांना त्रास सुरू झाला. त्यामुळे आयोजकांनी थेट गौतमीचा कार्यक्रम बंद करण्याचाच इशारा दिला. पण, तरीही मद्यपींची हुल्लडबाजी सुरूच राहिली. त्यांनी नंतर स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांना चोप द्यावा लागला. यावेळी मद्यप्राशन करून आलेल्या लोकांनी पत्रकारांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. एका दैनिकाच्या छायाचित्रकारावर, तर एक वाहिनीच्या व्हिडीओ जर्नालिस्टवर हल्ला करण्यात आला. दोघेही जखमी असून, दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT