“भाजपवाले कुठेय… ते सतरंजीखाली गेलेत”, ठाकरे भाजपच्या निष्ठावंतांबद्दल काय बोलले?
अमरावती व अकोल्याच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. ठाकरेंनी भाजपला चिमटे काढले आणि भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांची सतरंजी करून टाकलीये, असं म्हणत निष्ठावंतांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. ठाकरे नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जशी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस बांधायला घेतली, तसे उद्धव ठाकरेही मैदानात उतरलेत. उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी अमरावती व अकोल्याच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. ठाकरेंनी भाजपला चिमटे काढले आणि भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांची सतरंजी करून टाकलीये, असं म्हणत निष्ठावंतांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. ठाकरे नेमकं काय म्हणाले, तेच पाहुयात…
ADVERTISEMENT
अमरावतीत शिवसेनेचा (युबीटी) कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे म्हणाले, “माझ्यावर टीका करतात की मी घरी बसून होतो. मी घरी होतो पण, मी कुणाची घरं फोडली नाही. घरफोडे तुम्ही आहात. तुम्हीही म्हणाल की, घरी बसून काम केलं, हो केलं. पण, तुम्हाला घरं फोडूनही ते काम करता येत नाहीये. म्हणून तुम्हाला दारोदारी जावं लागतं आहे. अंगणवाडी सेविकांना साध्या गणवेशात बसायला सांगितलं जात आहे. ही वेळ का आली?”, असा सवाल करत ठाकरेंनी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपला टीकास्त्र डागलं.
…तर तुम्हाला आमदार विकत घ्यावे लागणार नाही -ठाकरे
पुढे ठाकरे असंही म्हणाले की, “मेळघाटात कुपोषण होतंय, तसंच ठाण्यातील जव्हारवाड्यात मी गेलेलो आहे. मी सरकारला दोष देत बसलो नाही. शिवसेनेने त्यांना महिनाभर पुरेल इतक्या पाण्याच्या बाटल्या आणि दुधाची भुकटी दिली. आज तुमच्याकडे खोके पडलेत. तुम्हाला माणसं विकत घेता येताहेत. तुम्ही आमदार विकत घेता आहात, पण त्याच पैशातून ही माणसं वाचवा ना. ती वाचवली तर त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला कुणाला विकत घ्यावं लागणार नाही. मतं सुद्धा विकत घ्यावी लागणार नाही.”
हे वाचलं का?
Explainer : शरद पवारांनी ‘हुकुमी पत्ते’ केले ओपन, आता भुजबळांसाठी लढाई अवघड?
“कामच करायचं नाही. फक्त हे फोड, ते फोड. मग हा जगातील सर्वात मोठा पक्ष. जगात क्रमांक एकवर आपले पंतप्रधान असतानाही तुम्हाला पक्ष फोडण्याची गरज का वाटते? शिवसेना फोडली, चोरताय. राष्ट्रवादी फोडली. दुसऱ्याचं चोरून घ्यायचं. भाजपवर ही वेळ का आली? मस्ती आणि आत्मविश्वास हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. भाजपला सत्तेची मस्ती आलीये, पण त्यांच्याकडे आत्मविश्वास नाही”, असा टोलाही ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला.
भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे म्हणाले सतरंज्या…
भाजपत बाहेरील पक्षातून येणारे मंत्री होतात आणि पक्षातील निष्ठावंत मात्र, तसेच राहत आहेत, असं सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता हे असं सगळं झालेलं आहे, पण मला याच्यात दया कुणाची येते, तर ती भाजपच्या कट्टर, निष्ठावंत कार्यकर्त्यांची. सामना चित्रपटातील गाणं बघत होतो कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. हे भाजपचे निष्ठावंत बिचारे, कोणतं ओझं घेऊन जाताहेत? त्या गाण्यात पुढे म्हटलंय की, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून… यांनी अक्षरशः भाजप रुजवण्यासाठी झिंजले.”
ADVERTISEMENT
वाचा >> एकनाथ शिंदेंना नको तेच होणार; अजित पवारांकडे जाणार तिजोरीच्या चाव्या!
– “मला त्यांचाबद्दल आदर आहे. आरएसएसच्या तमाम कार्यकर्त्यांबद्दल मला आदर आहे. मी व्हिडीओ बघितले की, मणिपूर, त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः तुडवायचे. तरी सुद्धा हे राहिले आणि त्यांनी तिकडे भाजप रुजवली. पण, यांनी तिकडे बिस्वाला घेतलं. इकडे यांना घेतलं (अजित पवार). या दरडी खाली हनुमान चालीसा पठण करा. पण, हनुमानाच्या हातातील द्रोणागिरी वेगळा होता आणि यांच्या हातातील द्रोणागिरी उपऱ्यांचा आहे. त्याच्या ओझ्याखाली तुम्ही दबून जाता आहात, हे तरी लक्षात येतंय का?”, असा सवाल ठाकरेंनी भाजप, आरएसएसच्या स्वयंसेवकांना केला.
ADVERTISEMENT
वाचा >> ‘अजित पवारांना आरएसएस, नितीन गडकरी गटाचा विरोध’, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली सगळी स्टोरी
“भाजपचा चांगला मोठा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्र्यांना शाल, श्रीफळ, उपमुख्यमंत्र्यांना अमूक, मंत्र्यांना तमूक, मग भाजपवाले कुठेय, ते काय सतरंजीच्या खाली गेलेत. तुमच्या आयुष्याच्या सतरंज्या करून टाकल्या आहेत. त्याच्या उरावर हे सत्तेची दहीहंडी बांधत आहेत. जी सत्ता तुम्ही भोगताहेत, त्या सत्तेचे काही शिंतोंडे भाजपच्या निष्ठावंतांना मिळणार आहेत की, नाही. मी हे तळमळीने बोलतोय कारण मी नीच आणि विकृत हिंदुत्ववादी नाहीये. जे वाड्या वस्त्यांवर तुमच्यासोबत फिरले, त्यांची जी काय अवस्था झाली आहे, ती अवस्था कुणी केली. सत्तेतून तुमचं कुपोषण होतंय, बाकीच्यांना अजीर्ण होतंय हे त्यांना लक्षात येतंय की नाही?”, अशी तोफ ठाकरेंनी डागली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT