Mla Disqualification : ठाकरे संतापले! निकालाआधीच नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात
Mla disqualification case Latest updates : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray On Rahul Narvekar Eknath shinde meeting before Mla Disqualification Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार आहेत. पण, या निकालापूर्वी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना संतप्त सवाल केला आहे. त्याचबरोबर या भेटीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्याआधीच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीकडे सुप्रीम कोर्टाचे लक्ष वेधले आहे.
नार्वेकर आणि शिंदे भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, एका लवादाचे न्यायमूर्ती एका पक्षकाराची निकाला आधी भेट कशी घेऊ शकतात, असा मुद्दा उपस्थित केला आहे, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. त्यांनी या भेटीचा मुद्दा उपस्थित करत नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.