Dombivli: आई-वडील गावाला गेले अन् दोन्ही तरुण मुलं कायमची गमावली!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

unfortunate death of brother and sister drowning in lake after taking dog for bath heartbreaking incident in dombivli
unfortunate death of brother and sister drowning in lake after taking dog for bath heartbreaking incident in dombivli
social share
google news

Dombivli Brother and Sister Death: डोंबिवली: आई-वडील गावाला गेल्याने मामाकडे राहायला गेलेला भावा-बहिणीचा अत्यंत दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतील (Dombivli) दावडी परिसरात घडली आहे. ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुत्र्याला तलावात आंघोळ करण्यासाठी नेलेल्या भावा-बहिणीचा (Brother and Sister drowning) पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आता समोर आलं आहे. (Unfortunate death of brother and sister drowning in lake after taking dog for bath, heartbreaking incident in Dombivli)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती रविंद्रन (वय 16 वर्ष) व रणजीत रविंद्रन (वय 22 वर्ष) असे मयत भावा-बहिणीचे नाव आहे. दोघे डोंबिवली पश्चिम उमेश नगर परिसरात राहत होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकी घटना काय?

डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात रणजीत रवींद्रन व कीर्ती रवींद्रन हे दोघे भाऊ-बहीण आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. रणजीत हा एमबीबीएसच्या (MBBS) शेवटच्या वर्षाला होता. तर कीर्तीने यंदा बारावीमध्ये प्रवेश घेतला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Who is Rupali Barua: 60व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीचं लग्न, दुसरी पत्नी अन् गुवाहटी कनेक्शन!

या दोन्ही भावा-बहिणींचे आई-वडील हे काही कामानिमित्त गावी गेले होते. त्यामुळे दोघे भाऊ-बहीण आपल्या मामाकडे राहत होते. याच मामाच्या घरी पाळीव कुत्रा आहे. ज्याच दोघांनाही फार लळा लागला होता. त्यामुळे रविवारी (28 मे) या कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी दोन्ही रणजीत आणि किर्ती हे आले होते.

खरं तर दर रविवारी दोघेही या तलावावर आपल्या या आवडत्या श्वानाला घेऊन येत होते. 28 मे रोजी दुपारच्या सुमारास रणजीत व कीर्ती हे दोघे नेहमीप्रमाणे स्कूटरवर कुत्र्याला घेऊन डोंबिवली जवळील दावडी परिसरातील तलावावर गेले होते. पण तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही क्षणार्धात तलावात बुडाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Crime: पोलीस महिलेसोबत लव्ह, सेक्स, अन्.. इंस्टाग्राममुळे घडली आयुष्यभराची अद्दल

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग मानपाडा पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर ते तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह हे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र, या घटनेने रवींद्रन कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे. आपली दोन्ही तरुण मुलं गमावल्याने त्यांच्या आई-वडिलांच्या दु:खाला पारावार उरलेला नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT