UPSC Result 2024 Shakti Dubey: UPSC परीक्षेत संपूर्ण देशात पहिली आलेली 'शक्ती' आहे तरी कोण?
UPSC Result 2024 1st Rank Shakti Dubey: UPSC परीक्षेत संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकविण्याचा मान हा प्रयागराजच्या शक्ती दुबे या तरुणीने मिळवला आहे. जाणून घ्या शक्ती दुबे नेमकी आहे तरी कोण.
ADVERTISEMENT

UPSC CSE Topper Shakti Dubey: नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज (22 एप्रिल) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 चा निकाल जाहीर केला. या वर्षीच्या निकालांमध्ये शक्ती दुबे हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर हर्षिता गोयलने दुसऱ्या क्रमांक मिळवला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1129 रिक्त पदे भरली जातील. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची (IAS) 180 पदे, भारतीय परराष्ट्र सेवेची (IFS) 55 पदे आणि भारतीय पोलीस सेवेची (IPS) 147 पदे समाविष्ट आहेत.
कोण आहे शक्ती दुबे?
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील यूपीएससी टॉपर शक्ती दुबेने अलिकडेच एका मॉक मुलाखतीत चहल अकादमीला सांगितलेले की, तिने अलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर तिने पदव्युत्तर शिक्षणासाठी बनारस विद्यापीठाची निवड केलेली आणि तिथेच बायोकेमिस्ट्रीमध्ये शिक्षण घेतलेले. शक्तीने 2018 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली होता. हा तिचा चौथा प्रयत्न होता ज्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स उत्तीर्ण झाल्यानंतर, तिने मुलाखतीत चमकदार कामगिरी केली आणि AIR 1 पटकवला.
हे ही वाचा>> UPSC Result 2024 Topper List: UPSC निकाल जाहीर, पाहा IAS टॉपर्सची संपूर्ण यादी
शक्ती म्हणाली की तिचे वडील, जे पोलीस सेवेत आहेत, ते तिचे सर्वात मोठे प्रेरणास्थान आहेत. तिने वडिलांना सरकारी सेवेत काम करताना पाहिले आहे, ज्यामुळे ती नागरी सेवेकडे आकर्षित झाली. वसतिगृहात राहत असताना, पोलिसांच्या उपस्थितीमुळे तिला सुरक्षिततेची भावना मिळाली, ज्यामुळे तिचा UPSC करण्याचा निर्णय आणखी बळकट झाला.
शक्ती म्हणाली की, नागरी सेवेत सामील होण्याचे तिचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा करणे आणि विविध आव्हानांना तोंड देणे आहे.










