दहावी-बारावीत नापास,तरीही खचले नाही, UPSC मिळवलं घवघवीत यश!

मुंबई तक

ADVERTISEMENT

upsc success story upsc toppers who failed in 10th 12th board exam becomen ias officer
upsc success story upsc toppers who failed in 10th 12th board exam becomen ias officer
social share
google news

UPSC Topper Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाने बुधवारी नागरी सेवा परीक्षा 2022 युपीएससीचा निकाल (UPSC Result) जाहिर केला.या परीक्षेत इशिता किशोरने (Ishita Kishor) ऑल इंडियात प्रथम रॅंक पटकावला, तिच्या पाठोपाठ गरिम लोहिया, उर्मी हर्थी एन आणि स्मृती मिश्रा या तरूणीने नंबर पटकावला आहे. या निकालानंतर आता युपीएससीत पास झालेल्या उमेदवारांच्या यशाची कहानी समोर येत आहेत. दरम्यान या परीक्षेत असे काही उमेदवार देखील होते ज्यांना दहावी, बारावी सारख्या बोर्डाच्या परीक्षेत अपयश आले होते, मात्र त्यांनी युपीएससीत घवघवीत यश मिळवले होते. हे उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (upsc success story upsc toppers who failed in 10th 12th board exam becomen ias officer)

ADVERTISEMENT

आयपीएस मनोज शर्मा यांची युपीएससी क्रॅक करण्याची कहानी देखील प्रेरणादायी आहे. मनोज शर्मा हे अॅवरेज स्टूडंट होते. 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत फक्त हिंदी या विषयात ते पास झाले होते. दहावीत तर त्यांना 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण आले होते. मनोज यांनी त्यांच्या चौथ्या प्रयत्नात 121 वा क्रमांक पटकावून युपीएससी पास केली होती. त्यानंतर ते आयपीएस ऑफिसर बनले होते. मनोज शर्मा यांच्या जीवनावर ट्वेल्थ फेल नावाचा पुस्तक देखील प्रसिद्ध आहे.

हे ही वाचा : Video: झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं… आणि म्हणे या शिक्षिका!

आयएएस अधिकारी अंजू शर्मा देखील दहावी, बारावीत नापास झाल्या होत्या. अंजू शर्मा दहावीच्या बोर्डाच्या पूर्व परीक्षेत रसायनशास्त्रात नापास झाल्या होत्या. यावेळी त्या कशाबशा दहावीत पास होऊन बारावीत पोहोचल्या होत्या. बोर्डाच्या परीक्षेत नापास होऊन देखील अंजू 1991 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनल्या.

हे वाचलं का?

UPSC परीक्षेचा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये 933 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 644 रँक मिळवणारा राजस्थानचा ईश्वर लाल गुर्जर देखील शाळेत नापास झाला होता. 10वी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर तो UPSC परीक्षेतही तीन वेळा नापास झाला. मात्र इतकं होऊनसुद्धा तो खचला नाही आणि त्याने चौथ्या प्रयत्नात UPSC क्रॅक केली.

राजस्थानच्या सीकर येथील रहिवासी असलेल्या मनोज महारिया यांनी UPSC निकालात 628 वा क्रमांक पटकावला होता. शाळेत मी खुप अॅवरेज स्टूडंट होतो. क्रिकेटसाठी अभ्यासापासून दूर राहिलो. 12वीचा निकाल खूप वाईट लागला असला तरी त्याला ड्रॉइंगमध्ये 84 मार्क मिळाले होते. आज तो UPSC उत्तीर्ण करून देशभर प्रसिद्ध झाला आहे.

ADVERTISEMENT

UPSC परीक्षा 2022 च्या निकालात पास झालेल्या आयएएस अधिकारी कुमार अनुरागची कहानी देखील अशीच आहे. अनुराग शाळेच्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झाले होते. विशेष म्हणजे अनुरागने सलग दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. पहिल्या प्रयत्नात त्यांनी 677 रॅंक पटकावली, तर दुसऱ्या प्रयत्नात 2018 साली त्यांनी UPSC परीक्षेत 48 वा क्रमांक मिळवला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : लिव्ह इन रिलेशन, मृतदेहाचे तुकडे तुकडे अन् फ्रिज…श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT