Video : मुंबई एसी लोकलमध्ये चढला, पण…, नंतर जे घडलं ते पाहुन आवरणार नाही हसू

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

सोशल मीडियावर (Social Media)दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत भरगच्च एसी लोकलमध्ये (Ac Local) एक प्रवाशी चढला होता. या प्रवाशामुळे लोकलचे दरवाजेच बंद होत नव्हते.त्यामुळे लोकल सुरु करण्यास अडचण येत होती. मात्र आरपीएफ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जी कार्यतत्परता दाखवली त्यामुळे ट्रेन मार्गस्थ झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (viral video mumbai ac local dahisar railway station men tried to adjust in local)

ADVERTISEMENT

व्हायरल व्हिडिओत काय?

पावसामुळे सध्या मुंबईच्या लोकल उशिराने धावत असतात किंवा काही ट्रेन तर रद्द देखील होत असतात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी जमते. आणि हिच गर्दी लोकलमध्ये शिरते.या संदर्भातला आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ हा दहिसर प्लॅटफॉर्मवरचा असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा :  Nagpur Crime : 14 किलो सोने, 200 किलो चांदी अन् 17 कोटी रोख; पोलिसही चक्रावले!

व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लॅटफॉर्मवर एसी लोकल आली आहे. आणि या लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांनी इतकी गर्दी केली आहे की लोकलचे दरवाजे देखील बंद होत नाही, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे एका प्रवाशाच्या शरीराचा अर्धा भाग हा दरवाजात अडकला आहे,ज्यामुळे लोकलचे दरवाजाचे लागत नाही आहेत. आणि जर दरवाजे लागले नाही तर लोकल सुरुच होणार नाही अशी अवस्था आहे. बर दरवाजे बंद होण्यासाठी कोणताही प्रवाशी उतरायला देखील मागत नाही आहे, अशी अवस्था झाली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान अशा परिस्थितीत घटनास्थळी एक हमाल येतो आणि प्रवाशाला लोकलच्या आत ढकलण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरी देखील हा व्यक्ती दरवाजामध्ये अडकत होता. अखेर घटनास्थळी आरपीएफ पोलीस दाखल होऊन प्रवाशाला जोराचा धक्का मारतात. त्यानंतर लोकलचे दरवाजे बंद होतात आणि लोकल मार्गस्थ होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yogesh Adhate (@yogeshadhate)

ADVERTISEMENT

योगेश अधाटे नावाच्या तरूणाने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअऱ केला आहे. या व्हिडिओवर त्याने भन्नाट कॅप्शन लिहली आहे. आयुष्य चांगल जगण्यासाठी मी एसीचा पास घेतला पण अशी अवस्था झाली आहे. एकंदरीत एसीचा पास काढूनही आयुष्यात धकाधकी आणि धावपळ झाल्याचे सांगताना तो दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरता येत नाही. कारण अनेकांनी आरामदायी प्रवासासाठी एसी लोकलची निवड केली होती.मात्र आता एसी लोकलचीही सर्वसामान्य लोकलप्रमाणे अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याव व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maharashtra Weather Forecast : घरीच थांबा! मुंबई-पुण्यासह 9 जिल्ह्यांना अलर्ट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT