अनुष्का-विराट लंडनला का झाले शिफ्ट? मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पतीने आता सांगितलं खरं कारण!

मुंबई तक

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये का शिफ्ट झाले? माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी यामागचे कारण सांगितले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. मात्र, गेल्या काही काळापासून विराट आणि अनुष्का आपल्या दोन्ही मुलांसह लंडनमध्ये राहत असल्याने त्यांच्या परदेशातील वास्तव्यासंदर्भात अनेक चर्चा होत आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी विराट-अनुष्का लंडनला का शिफ्ट झाले, याबाबतचा अनुभव सांगितला आहे.

यशामुळे खासगी आयुष्यावर वाढलं लक्ष

2025 मध्ये रणवीर इलाहाबादियाच्या यूट्यूब शोमध्ये सहभागी होताना डॉ. श्रीराम नेने यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याशी झालेल्या भेटींचा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी विराटबद्दल मोठा आदर असल्याचे सांगितलेले. विराटला त्यांनी अत्यंत चांगला व्यक्ती असल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा>> कोथरुडच्या कुलकर्णी आणि पेठेतले बापट, ध्वनी प्रदुषणावर बेधडक चर्चा VIDEO

याच संभाषणात श्रीराम नेने यांनी अनुष्का शर्मा यांच्यासोबत झालेल्या चर्चेची आठवण सांगितली होती. त्यावेळी विराट आणि अनुष्का लंडनला जाण्याचा विचार करत होते, असे त्यांनी सांगितले.

‘भारतात यशाचा आनंदही घेता येत नव्हता’

श्रीराम नेने यांच्या म्हणण्यानुसार, विराट आणि अनुष्का यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे त्यांच्या खासगी आयुष्यावर सतत लोकांचे लक्ष असते. भारतात मिळालेल्या यशाचा आणि लोकप्रियतेचा मोकळेपणाने आनंद घेता येत नसल्याची भावना त्यांना होती.