Wagh Nakh : वाघनखं खरी की खोटी... सरकार आणि इतिहास संशोधकाचा दावा काय?

मुंबई तक

Wagh Nakh News : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या कोथळा बाहेर काढण्यासाठी ज्या वाघनखांचा वापर केला होता, तीच हीच वाघनखं असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. तर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत,असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आहे

ADVERTISEMENT

बहुप्रतिक्षित वाघनखं अखेर महाराष्ट्रात पोहोचली आहेत.
wagh nakh brought from london victoria and albert museum real or fake sudhir mungantiwar indrajit sawant chhatrapati shivaji maharaj afzal khan ripped apart
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाघनखं अखेर महाराष्ट्रात पोहोचली आहेत.

point

''लंडनहून आलेली वाघनखं शिवरायांची नाहीत''

point

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला दावा

Wagh Nakh News : लंडनच्या व्हिक्टोरीया अॅड अल्बर्ट संग्रहालयातून बहुप्रतिक्षित वाघनखं अखेर महाराष्ट्रात पोहोचली आहेत. साताऱ्यात ही वाघनखं आजपासून प्रदर्शनासाठी ठेवली गेली आहेत. आणि उद्यापासून नागरीकांना ही वाघनखं पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या कोथळा बाहेर काढण्यासाठी ज्या वाघनखांचा वापर केला होता, तीच हीच वाघनखं असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. तर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत,असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आहे.त्यामुळे विरोधकांनी देखील वाघनखांवरून सरकारला घेरलं आहे. त्यामुळे साताऱ्यात आलेली वाघनखं खरी की खोटी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (wagh nakh brought from london real or fake sudhir mungantiwar indrajit sawant chhatrapati shivaji maharaj afzal khan ripped apart)

मुनगंटीवारांचा दावा काय? 

विधानसभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की,  अनेक शिवभक्तांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन मध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली होती. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे पाठवली होती. व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे सदर वाघनखे दिली जाण्यापूर्वी लंडनमध्ये १८७५ व १८९६ या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखे प्रदर्शित झाली होती. त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणेही काही शिवभक्तांनी पाठवली, ज्यात ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केला असल्याचे त्या बातम्यात म्हटले होते, असे मुनगंटीवार यांनी सांगितले होते. 

हे ही वाचा : Ladka Bhau Yojana GR Download: लाडका भाऊ योजनेचा जीआर करा डाऊनलोड, तरुणांनो पाहा पैसे कसे मिळतील!

तसेच लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली होती. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात किंवा बोलणी केली तेव्हाही या संग्रहालयाने कधीही ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे नाकारले नाही, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला दिली होती.

वाघनखं आणण्यासाठी किती खर्च झाला? 

वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटींचा खर्च आला नसल्याचे सांगत हे पूर्ण असत्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले होते. या वाघनख्यांसोबत छत्रपती शिवरायांचा इतर शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी लागणाऱ्या म्युझियमच्या डागडूजीसाठी आणि नूतनीकरणासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp