Russia : येवजेनी प्रिगोझिन यांच्या वॅग्नेरने व्लादिमीर पुतिन विरोधात का केलं बंड?
पुतिन यांनी येवजेनीविरुद्ध इतका कडकपणा दाखवला की, ते यापुढे रशियाला नाही तर बेलारूसला जाणार आहेत. त्यानंतर येवजेनी प्रिगोझिन यांनी शनिवारी उशिरा अचानक घोषणा केली की बंड मागे घेतलं आहे.
ADVERTISEMENT

russia wagner group explained : युक्रेन-रशियात युद्धसंघर्ष सुरू असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात मोठं बंड छेडलं गेलं. हे बंड 12 तासांतच शमलं. अखेर शनिवारी रात्री वॅग्नेर या लष्करी गटाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन आणि रशिया यांच्यात करार झाला. रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची चर्चा करणाऱ्या येवजेनी यांनी अवघ्या 12 तासांतच भूमिका बदलत कराराच्या टेबलावर आले. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी वॅग्नेर ग्रुपचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन आणि रशिया सरकारमध्ये करार घडवून आणला. या करारानंतर प्रिगोझिनने आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचे आदेश दिले.
पुतिन यांनी येवजेनीविरुद्ध इतका कडकपणा दाखवला की, ते यापुढे रशियाला नाही तर बेलारूसला जाणार आहेत. त्यानंतर येवजेनी प्रिगोझिन यांनी शनिवारी उशिरा अचानक घोषणा केली की बंड मागे घेतलं आहे.
येवजेनीचा यू टर्न
येवगेनी प्रिगोझिन यांनी अधिकृत टेलिग्राम चॅनेलद्वारे एक निवेदन जारी केले की, “रक्तपात होऊ शकतो म्हणून एका पक्षाने जबाबदारी समजून घेतली जेणेकरून ते रोखता येईल. आम्ही आमच्या टोळ्या माघारी बोलवत आहोत आणि ठरल्याप्रमाणे फील्ड कॅम्पमध्ये परत जात आहोत. निवेदनानंतर काही तासांतच वॅग्नेरचे सैन्य ट्रकमध्ये बसून शहरं सोडताना दिसले. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांनी वॅग्नेर सैनिकांसोबत सेल्फी काढून त्यांचा जयजयकार केला.
लुकाशेन्को यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
पुतिन यांचे मित्र आणि बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी हे बंड संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मध्यस्थाची भूमिका बजावत लुकाशेन्कोने रशिया आणि येवजेनी यांच्यात एक करार केला, ज्यानंतर येवजेनीने आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचे आदेश दिले. लुकाशेन्कोच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, या चर्चेदरम्यान पुतिन यांच्याशी सतत समन्वय साधला गेला. त्यानंतर करारावर सहमती होऊ शकली आणि येवजेनी मागे हटण्यास तयार झाले. येवजेनी आता बेलारूसमध्ये राहणार आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणतात, ‘खासगी रशियन लष्करी कंपनी वॅग्नेरचे प्रमुख तणाव कमी करण्याच्या करारांतर्गत शेजारच्या बेलारूसमध्ये जातील आणि त्यांच्यावरील फौजदारी खटला बंद केला जाईल.’