आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय शिकवण मिळते, त्यांच्या निरुपणाचा नेमका पाया काय आहे हेच आपण या लेखातून जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) सोहळ्यादरम्यान 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याने या संपूर्ण सोहळ्यालाच गालबोट लागलं. त्यामुळे शिंदे सरकारवर (Shinde Govt) सध्या बरीच टीका केली जात आहे. असं असताना आता ज्या आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला ते बरेच चर्चेत आले आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारे श्री सदस्य संपूर्ण जगभरात आहे. ‘श्री समर्थ बैठकी’च्या माध्यमातून लाखो श्री सेवक हे या सांप्रदायाशी जोडले गेले आहेत. आता अनेक जण असंही विचारत आहे की, श्री समर्थ बैठकीत अशी काय शिकवण दिली जाते की, ज्यामुळे लाखो लोक हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मानतात? (what exactly is taught in appasaheb dharmadhikaris shree samarth baithak)
ADVERTISEMENT
समर्थ बैठकीत नेमकी काय शिकवण दिली जाते आणि कोणत्या आध्यात्मिक गोष्टींचा आधार घेतला जाते हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.
‘श्री समर्थ बैठकी’ची सुरुवात कशी झाली?
श्री समर्थ बैठकीची सुरुवात ही महाराष्ट्र भूषण नारायण धर्माधिकारी उर्फ नानासाहेब यांनी केली होती. नानासाहेब धर्माधिकारी यांचा मूळ व्यवसाय हा ज्योतिषशास्त्राचा होता. पण याच दरम्यान त्यांनी समर्थ रामदासांनी लिहिलेल्या दासबोध आत्मसात करुन त्याच आधारावर बैठकीला सुरुवात केली. सुरुवातील अवघ्या सात श्री सदस्य असलेल्या या बैठकीची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि नंतर देशा-परदेशात देखील बैठक सुरू झाल्या. नानासाहेबांनी सुरू केलेल्या या बैठकीची परंपरा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी देखील कायम ठेवली. गेली अनेक वर्ष त्यांनी समर्थ बैठकीची परंपरा कायम ठेवली आहे.
हे वाचलं का?
श्री समर्थ बैठकीत नेमकी काय दिली जाते शिकवण?
ज्या श्री समर्थ बैठकीसाठी लाखो लोक हे वर्षानुवर्षे जातात. त्या संपूर्ण बैठकीचा पाया हा रामदास स्वामींनी रचलेल्या दासबोधावर आहे. मुळात बैठक म्हणजे काय ते आपण आणि समजून घेऊया. बैठकी ही एका मोठ्या घरात किंवा हॉलमध्ये भरवली जाते. ज्यासाठी आठवड्यातील एक वार निश्चित असतो. महिला, पुरुष आणि लहान मुलं-मुली यांच्यासाठी वेगवेगळ्या बैठका असतात. प्रोढांसाठी ज्या बैठका असतात त्यात दासबोधाच्या प्रत्येक समासावर एक व्यक्ती निरुपण करतं. बैठकीत एक उच्चासन असतं ज्यावर केवळ दोनच लोकं बसतात. एक निरुपण करणारी व्यक्ती आणि दुसरी दासबोधाच्या समासाचं वाचन करणारी. जी व्यक्ती निरुपण करते त्या व्यक्तीला संपूर्ण श्री समर्थ बैठकीत अधिकारी म्हटलं जातं.
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
जेव्हा हे अधिकारी उच्चासनावर बसून निरुपण करतात तेव्हा बैठकीत शेकडो लोक खाली बसून त्या निरुपणाचं श्रवण करतात. जे लोक श्रवण करतात त्यांना बैठकीत श्रोते असं म्हणतात.
ADVERTISEMENT
बैठकीची सुरुवात कशी होते?
महिलांची बैठक ही सकाळी किंवा दुपारच्या वेळेत असते तर पुरुषांची बैठक ही रात्री 8 वाजेच्या सुमारास असते. बैठक ही साधारण 2.30 तास चालते. सुरुवातीला पुरुषांची बैठक ही आठवड्यातून दोन दिवस भरवली जायची. मात्र, आता मागील काही वर्षांपासून ती बैठक केवळ एकच दिवस असते.
ADVERTISEMENT
बैठकीत शिस्त ही महत्त्वाची असते. कारण बैठकीसाठी येणाऱ्या प्रत्येकासाठी हजेरी ही अनिवार्य असते. जर सलग 4 बैठका एखादा श्री सदस्य गेला नाही आणि त्याने त्याबाबत बैठकीत निवदेन दिले नाही तर त्याचे हजेरीवरून नाव कमी केले जाते.
हे ही वाचा>> Maharashtra Bhushan : अखेर ओळख पटली, मृत्यू झालेले 13 श्री सदस्य कोण?
बैठकीची सुरुवात ही मनाच्या श्लोकांनी होते. मनाचे श्लोक हे साधारण पंधरा मिनिटे चालतात. त्यानंतर नेमक्या निरुपणाला सुरुवात होते. प्रत्येक बैठकीत निरुपणाची सुरुवात ही दासबोधाच्या पहिला दशक आणि पहिल्या समासाने होते. यावर साधारण तासभर निरुपण होतं. हा समास कायम स्वरुपी निरुपणासाठी घेतला जातो. पहिल्या समासावर निरुपण झाल्यानंतर दुसऱ्या दशकातील दुसरा समास घेतला जातो. म्हणजेच दर आठवड्याला पहिल्या तासानंतर जे निरुपण सुरु होते त्यासाठी दशक आणि समास हा बदलला जातो.
निरुपण म्हणजे काय, निरुपणातून काय दिली जाते शिकवण?
निरुपण हे दासबोधातील ओव्यांवर केलं जातं. पण निरुपणात दाखले हे कधी पौराणिक तर कधी काही दंतकथा किंवा सध्याच्या चालू घडामोडींवर केलं जातं. यावेळी अंतरात्मा, मन, शरीर, पंचमहाभूत, उपासना, श्रवण या सगळ्यावर विशेषत: भाष्य केलं जातं.
माणसाला विषय आणि विकार असतात.. म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर.. वैगरे निरुपणचा संपूर्ण गाभा हा या सगळ्यावरच असतो. मानवाचं समाजात नेमकं वर्तन कसं असावं हे ऐक प्रकारे निरुपण स्वरुपात केलं जातं.
महत्त्वाची बाब म्हणजे… याच निरुपणातून अनेकदा अंधश्रद्धेवर, वाईट चालीरीती.. परंपरा यावर प्रहार केले जातात. बैठकीत येणाऱ्या व्यक्तीने बुवा-भोंदूबाबा यांच्या नादी लागू नये असं वारंवार सांगितलं जातं. अनिष्ट चालीराती, कुप्रथा यांचा त्याग करावा असंही या ठिकाणी असलेल्या श्रोत्यांना सांगितलं जातं किंवा त्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो.
हे ही वाचा>> जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला चेंगराचेंगरीचा व्हिडीओ, म्हणाले…
मुळात सुरुवातीला बैठकीची सुरुवात झाली तेव्हा अनेक आदिवासी पाडे आणि ग्रामीण भागातील लोकं तिथे येण्यास सुरुवात झाली. यातील बहुतांशी लोकं व्यसनांच्या आहारी गेले होते. मात्र, याबाबत असा दावा करण्यात येतो की, बैठकीला गेल्यामुळे अनेक लोकांचं मनपरिवर्तन झालं. श्रवणामुळे त्यांची व्यसनापासून मुक्ती झाली. सारासार विचार करण्याची त्यांची क्षमता वाढली आणि त्यामुळेच त्यांनी बैठक, समर्थ यांच्यावरील श्रद्धा अगाढ झाली.
हीच शिकवण आपण वर्षानुवर्षे देऊन चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्वत: आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सांगितलं आहे. हाच त्यांच्या बैठकीचा, शिकवणीचा पाया असल्याचं बोललं जातं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT