Suraj Chavan : काय आहे खिचडी घोटाळा, ठाकरेंचे निकटवर्तीय चव्हाणांना का झाली अटक?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

why did ed arrested suraj chavan, a close aide of Aaditya Thackeray
why did ed arrested suraj chavan, a close aide of Aaditya Thackeray
social share
google news

BMC khichdi scam case : कोविडमुळे लॉकडाऊन लावण्यात आला. या काळात मुंबईत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी बृहन्मुंबई महापालिकेने खिचडी वाटप केले होते. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते ईडीच्या रडारवर आहेत. यापैकी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना बुधवारी (17 जानेवारी) रात्री ईडीने अटक केली. त्यामुळे बीएमसी खिचडी प्रकरण काय आहे आणि सूरज चव्हाण यांच्याशी काय संबंध आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. (why did ED Arrested Suraj Chavan, who is a close aide of Aaditya Thackeray)

मुंबई महापालिका खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे ईडीने या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला होता. आधी मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ईडीने सूरज चव्हाण यांच्या घरी झाडाझडती घेतली होती. त्याचबरोबर ईडीनेही त्यांची चौकशीही केली होती. सूरज चव्हाण यांच्याविरुद्ध ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून त्यांना अटक होईल अशी चर्चा सुरू झाली होती.

सूरज चव्हाण कोण आहेत? (who is Suraj Chavan)

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पीए (personal assistant) आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते ठाकरेंसोबत काम करताहेत. चव्हाण यांना 2018 मध्ये शिवसेना सचिव बढती देण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर सूरज चव्हाण यांचा त्यांच्या मंत्रालयामध्ये वावर वाढला होता. युवा सेनेने लढवलेल्या विद्यापिठाच्या निवडणुकीत चव्हाण यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> खिचडी घोटाळ्यातील ‘ती’ कंपनी शिंदेंच्या नेत्याची! वाचा Inside Story

सूरज चव्हाण यांनी केलेली सूचना हा आदित्य ठाकरे यांचा आदेश असंच पक्षात समजलं जायचं. त्याचबरोबर ते आदित्य ठाकरेंसोबत सगळीकडे असत. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील सर्व कामे बघण्याची जबाबदारीही सूरज चव्हाण यांच्यावर आहे.

खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांना का झाली अटक?

कोविडमुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात अनेक स्थलांतरित मजूर मुंबईत अडकून पडले होते. या मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने खिचडी तयार करून वाटप करण्याचे कंत्राट कंत्राटदाराला दिले होते. याच प्रकरणात असा आरोप करण्यात आलेला आहे की, सूरज चव्हाण यांनी राजकीय प्रभाव टाकून आरोपी असलेल्या खासगी फर्मला कंत्राट मिळवून दिले. फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस असे त्या फर्मचे नाव आहे.

ADVERTISEMENT

फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या कामासाठी पात्र नसतानाही हे कंत्राट दिले गेले होते. कारण खिचडी तयार करून वाटपाचे हे काम होते, पण फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसकडे अन्न बनवण्याचा परवानाच नव्हता. त्यामुळे फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसने खिचडी बनवण्याचे काम स्नेहा केटरर्सला दिले होते.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> हिशोब तर द्यावाच लागेल! सोमय्यांचा BMC आयुक्तांवर गंभीर आरोप

याप्रकरणात फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसने लाखो रुपये सूरज चव्हाण यांना दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली. हे पैसे आपल्याला कन्सल्टन्सी फीस म्हणजे सल्लागार शुल्क म्हणून दिल्याचे चव्हाण यांनी सांगितल्याचे ईडीतील सुत्रांनी सांगितले होते.

कथित आरोपानुसार बीएमसी आणि कंत्राटादारामध्ये असा करार झालेला होता की, पॉकेटमध्ये 250 ग्रॅम खिचडी असेल, पण प्रत्येक पॉकेटमध्ये 125 ग्रॅम खिचडीच कंत्राटदाराने मजुरांना दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT