WhatsApp ने केलं भारी काम! आता Reels प्रमाणे पाठवा व्हिडिओ मेसेज

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Whatsapp Another new feature has been added on this platform, with the help of which you will be able to send short video messages.
Whatsapp Another new feature has been added on this platform, with the help of which you will be able to send short video messages.
social share
google news

WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी सतत या प्लॅटफॉर्मवर नवीन फिचर्स आणत असते. या प्लॅटफॉर्मवर आणखी एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही छोटे व्हिडिओ संदेश पाठवू शकणार आहात.

WhatsApp कंपनीने या फीचरला व्हिडिओ मेसेज असे नाव दिले आहे. हे फीचर ऑडिओ मेसेज सारखेच आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही लगेच रिप्लाय देऊ शकता. या फीचरच्या मदतीने युजर्स कोणत्याही टेक्स्ट किंवा ऑडिओ मेसेजला झटपट उत्तर देण्यासाठी व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करू शकतात.

नवीन फीचरमध्ये काय खास आहे?

व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर रिअल-टाइम व्हिडिओ मेसेजिंग सेवेशी निगडित आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही 60 सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवू शकता. हे संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे फिचर लागू करण्यात आले असून, पुढील काही आठवड्यांत सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Sambhaji Bhide : “महात्मा गांधींचे वडील मुस्लीम जमीनदार”, भिडेंनी तोडले तारे

Meta CEO मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्ट शेअर करून या फीचरची माहिती दिली आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपवर कसे काम करेल हेही त्यांनी सांगितले आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर रिअल टाईम व्हॉईस मेसेजिंगप्रमाणे काम करेल.

WhatsApp Feature कसे चालेल?

सर्वप्रथम, तुम्हाला कोणतेही WhatsApp चॅट उघडावे लागेल. येथे तुम्हाला मजकूर बॉक्सच्या पुढे व्हिडिओ रेकॉर्डर चिन्ह दिसेल. व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला या चिन्हावर क्लिक करावे लागेल आणि 60 सेकंदांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

ADVERTISEMENT

वाचा >> फडणवीसांच्या नागपुरात दुहेरी हत्याकांड! व्यापाऱ्यांना गोळ्या घातल्या, जाळलं अन्…

कंपनीने या फीचरबद्दल संपूर्ण माहिती देणारा एक ब्लॉग देखील शेअर केला आहे. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. या फीचरसाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या नवीनतम आवृत्तीची आवश्यकता असेल म्हणजेच तुम्हाला तुमचं व्हाटअसअप अपडेट करून घ्यावं लागेल.

ADVERTISEMENT

वाचा >> NIA : डॉक्टरची पुण्यातून घातक कृत्ये? तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!

कंपनीने हे फिचर आणले आहे, जे येत्या काही आठवड्यांत सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल. व्हॉट्सअॅप अपडेट करूनही तुम्हाला हे फीचर मिळत नसेल, तर तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT