'दीनानाथ' प्रकरणात वादळाच्या केंद्रस्थानी, राजीनामा देणाऱ्या डॉक्टर घैसास यांची हिस्ट्री काय?
Sushrut Ghaisas: तनुषा भिसे यांचे उपचार हे डॉ. घैसास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अधिकृत वेबसाईटवरुन घैसास यांची माहिती काढून टाकण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर संताप
राज्यभरात चर्चेत आलं दीनानाथ रुग्णालय
डॉ. सुश्रूत घैसास यांनी दिला राजीनामा
कोण आहे डॉक्टर सुश्रूत घैसास?
Dr. Sushrut Ghaisas : तनिषा भिसे प्रकरणात राज्य सरकारच्या समिती स्थापन केली होती. या समितीने त्यांची निरिक्षणं नोंदवली आहेत. या निरीक्षणांमध्ये डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आला आहे. भिसे यांनी योग्य वेळेत उपचार करणं गरजेचं होतं असं अहवालात म्हणण्यात आलं आहे. दुसरीकडे घैसास यांनी दीनानाथमधील त्यांच्या पदाचा देखील राजीनामा दिला आहे. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी देखील पत्रकार परिषदेत घैसास यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं. भिसे प्रकरण हे या घैसास डॉक्टरांच्या अवतीभवती फिरताना दिसत आहे. त्यामुळे हे डॉ. सुश्रुत घैसास नेमके कोण आहेत हा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Who is Doctor Sushrut Ghaisa)
घैसास वादळाच्या केंद्रास्थानी
तनिषा भिसे (Tanisha Bhise Case) यांचे उपचार हे डॉ. घैसास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते. डॉ. घैसास यांनी भिसे यांना जोखमीच्या आणि धोकादायक प्रेग्नन्सीबाबत माहिती दिल्याचं दीनानाथने समोर आणलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे. शासनाच्या समितीच्या अहवालानुसार 28 मार्चला सकाळी 9 वाजता भिसे कुटुंबिय डॉ. घैसास यांना फोन करुन बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आले होते. डॉ. घैसास यांनी भिसे यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर त्यांना खर्चाबाबतची देखील कल्पना दिली होती असं देखील शासनाच्या समितीच्या अहवालामध्ये म्हटलं आहे.
डॉ. घैसास हे प्रसुतीतज्ञ
त्यामुळे आता भिसे प्रकरणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. घैसास हे प्रसिद्ध प्रसुतीतज्ञ आणि स्रीरोग तज्ञ आहेत. घैसास हे मुळे पुण्याचे रहिवासी आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घैसास हे प्रसुतीतज्ञ आणि स्रीरोग तज्ञ आहेत. घैसास हे त्यांच्या जोखमीच्या प्रेग्नंसी आणि फेटल मेडिसीनसाठी प्रसिद्ध आहेत.
लंडनमधून फेलोशिप
हे ही वाचा >> Fact Check: मुंब्य्राचा 'तो' Video अन् राज ठाकरेंना विचारतायेत जाब.. काय आहे हे सगळं प्रकरण?
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून डॉ. घैसास यांनी MBBS ची पदवी घेतली आहे. त्यानंतर प्रसुतीशास्त्रातील पुढील शिक्षणासाठी ते मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये गेले. त्यानंतर चैन्नईमध्ये त्यांना पुढील शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली. लंडनमधील किंग्ज कॉलेज आणि रॉयल फ्री हॉस्पिटल मधून त्यांनी फेटल मेडिसीनमध्ये फेलोशिप देखील मिळवली आहे.










