Ravindra Waikar : 'या' गोष्टींमुळे रवींद्र वायकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

आमदार रवींद्र वायकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला.
रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना का सोडली?
social share
google news

Ravindra Waikar Shiv Sena : आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ अखेर सोडली. 9 मार्च रोजी उद्धव ठाकरेंचे स्वागत करणारे वायकर 10 मार्च रोजी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. वायकरांनी ठाकरेंची सेना का सोडली याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. पण, वायकर यांनीच शिंदेंच्या पक्षात जाण्याची कारणे सांगितली. (Why Ravindra Waikar Quits Shiv Sena Uddhav balasaheb Thackeray party)

शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर बोलताना वायकर यांनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पक्षांतराच्या कारणाचाही उल्लेख केला. ते काय म्हणाले वाचा...

रवींद्र वायकर यांनी काय सांगितली कारणे?

"मी गेली 50 वर्षे शिवसेनेत काम केलं आहे. 1974 ची पहिली जोगेश्वरीतील दंगल, त्यावेळेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचं पडेल ते काम केलं आहे. चार वेळा नगरसेवक, चार वेळा स्टँडिंग कमिटी, तीन वेळा आमदार हे पर्यायाने आला. पण, आता ज्यावेळी मी इथे पक्षप्रवेश करतोय त्यामागचं कारण वेगळं आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "शरद पवारांचा हात ज्याच्यावर पडतो, तो भस्म होतो", सावंतांची ठाकरेंवर अरे तुरे करत टीका

"पहिले तर कोविड होता त्यावेळी कामे झाली नव्हती. पण आता जी कामे आहेत, प्रामुख्याने आरेच्या बाबतीत पाहिलं, तर 173 कोटी रुपये मला आरेच्या रस्त्यासाठी पाहिजेत. लोकं रडत आहेत. आरेबाबत लोकं रडत आहे की, आमच्याकडे 45 किमीचे रस्ते होणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रॉयल पंप सारख्या परिसरात अत्यंत उत्तम पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही. अशावेळेला धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं महत्त्वाचं असतं. अशा धोरणात्मक निर्णय बदलले नाहीत तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही."

हेही वाचा >> पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, महिला नेत्याची भरदिवसा हत्या!

"माझ्या इथे पीएमजीबी कॉलनी आहे. या कॉलनीसाठी मी पत्रव्यावहार करायचो. त्या 17 बिल्डिंग पडल्या तर मग काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे. सर्वोदय नगरचा प्रश्न आहे. एनडी झोनचा प्रश्न आहे. धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही. सत्तेत असताना आपण धोरणात्मक निर्णय सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं काम सुरु आहे. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे. हे प्रश्न सोडवले नाहीत तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही."

ADVERTISEMENT

ठाकरेंवर टीका करणे टाळले

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाताना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, रवींद्र वायकर यांनी ठाकरेंबद्दल बोलणं टाळलं. 

ADVERTISEMENT

महत्त्वाचं म्हणजे जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणामुळे रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे राजकीय वर्तुळातून म्हटले जात आहे. मात्र, याबद्दल वायकरांनी भाष्य करणे टाळले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT