अजबच… एक हृदय, एक शरीर पण डोकी दोन, महिलेने दिला तिळ्यांना जन्म

मुंबई तक

ADVERTISEMENT

women gave birth three children two babies are conjoined twins while third was born normally jalgaun story
women gave birth three children two babies are conjoined twins while third was born normally jalgaun story
social share
google news

जळगाव (jalgaun) जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका महिलने तिळ्यांना (women birth three children)  जन्म दिल्याची घटना घडली आहे. यामधील दोन बाळ ‘जुळलेली जुळे” आहेत, तर अन्य तिसरी मात्र सर्वसामान्यपणे जन्माला आली आहे.विशेष म्हणजे या जन्माला आलेल्या या तिन्ही मुली आहेत. या तिळ्याना सध्या एनआयसीयूमध्ये (ICU) ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या तिळ्यांच्या जन्माने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या घटनेची चर्चा शहरात रंगली आहे. (women gave birth three children two babies are conjoined twins while third was born normally jalgaun story)

जळगावच (jalgaun) माहेर आणि मध्यप्रदेशात (madhya pradesh) वास्तव्यास असलेल्या महिलेने मंगळवारी तिळ्यांना जन्म दिला. त्यातील दोघी ‘जुळलेली जुळे” आहेत, तर अन्य तिसरी मात्र सर्वसामान्यपणे जन्माला आली आहे. ‘जुळलेली जुळे’ सव्वा दोन किलो वजनाची आहेत. दोघींना एकच हृदय, दोन हात आणि दोन पाय आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही मुली आहेत. या तिळ्याना सध्या एनआयसीयूमध्ये (ICU) ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात महिलेवर प्रसुती पार पडली होती.

हे ही वाचा : बारावीच्या निकालाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी लागणार निकाल

शरीर एकच असल्याने त्यांना सध्या ऑक्सिजनवर (ICU) ठेवण्यात आले आहे. या बालकांवर शस्त्रक्रिया करणेही अवघड असल्याचे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरव महाजन यांनी व्यक्त केले. धड एक आणि दोन डोके असल्याने या दोघांचे मेंदू देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे जसजशी मुलींची शारीरिक वाढ होईल. तसतसा त्यांच्यात कोणते शारीरिक बदल घडतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान याआधी हिंगोलीत एका महिलेने तिळ्यांना जन्म दिल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातील वाकोडी येडोबा (ता. कळमनुरी) येथील महिलेने तिळ्यांना (women birth three children) जन्म दिला होता. यामध्यो दोन मुलांचा तर एका मुलीचा जन्म झाला होता. या तिघांच्या जन्मात एक एक मिनिटाचा फरक होता. या तिन्ही बाळाचे वजन 1 किलो 800 ग्रॅम, 1 किलो 700 ग्रॅम, 1 किलो 600 ग्रॅम असे आहे. या तिळ्यांच्या जन्माने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे ही वाचा : मुंबईत लव्ह जिहाद? भांडूपची मुलगी थेट आझमगडला, नेमकं काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT