Pune Accident : पुण्यात पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडले! थरकाप उडवणारी घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

पोर्शेने कारने दुचाकीला दिली धडक, दोघांचा जागीच मृत्यू.
पुण्यातील अपघात झाल्यानंतरची दृश्ये.
social share
google news

Pune Car Accident News : पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री थरकाप उडवणारा अपघात झाला. एका पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडले. यात दोघे जागीच ठार झाले. (Porsche car crushed young girl and boy in pune)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१८ मे) मध्यरात्री पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शेने कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा जागीच  मृत्यू झाला. 

पोर्शेने दुचाकी उडवली, नेमकं काय घडलं?

माहितीनुसार, तक्रार दिलेला तरुण आणि त्याचे मित्र कल्याणीनगरमध्ये असलेल्या बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करून घरू निघाले होते. त्याचवेळी कल्याणी-विमानतळ रोडवर वेगात आलेल्या पोर्शे कारने दुचाकीला जोराची धडक दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "उद्धव ठाकरेंना मी पाच वेळा बोललो, भाजपसोबत युती करा" 

कारने इतक्या जोरात धडक दिली की, दुचाकीवरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा हे दूरवर फेकले गेले. रस्त्यावर जोरात आपटल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रात्री अडीच वाजता ही घटना घडली.

हेही वाचा >> "मला संध्याकाळीच पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला असता" 

येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिब रमजान मुल्ला यांनी या प्रकरणी तक्रार दिली.

ADVERTISEMENT

अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न

दुचाकीला धडक दिल्यानंतर पोर्शे गाडीच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, लोकांनी त्याची गाडी अडवली. त्याला पकडून जबर चोप दिला. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT