YS Sharmila : मुख्यमंत्री भावाकडून नजरकैदेची भीती, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कार्यालयातच झोपल्या
YS Sharmila Reddy Stayed in Congress party office : वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पक्षाच्या कार्यालयात मुक्काम

वायएस शर्मिला रेड्डी सरकारविरोधात आक्रमक

बेरोजगारीच्या मुद्द्यावर भावाच्या सरकारविरोधात आंदोलन
YS Sharmila : आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला यांनी आज विजयवाडा येथे आयोजित ‘चलो सचिवालय’ आंदोलनापूर्वी संपूर्ण रात्र काँग्रेस कार्यालयातच काढली. वायएस शर्मिला यांना भीती होती की सरकार त्यांना नजरकैदेत ठेवेल, म्हणूनच त्या रात्रभर काँग्रेस कार्यालयातच थांबल्या.
बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगनमोहन रेड्डी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी (मुख्यमंत्री जगनमोहन यांची बहीण) यांनी गुरुवारी विजयवाडा येथे 'चलो सचिवालय' आंदोलनाची हाक दिली आहे.
या प्रदर्शनापूर्वी वायएस शर्मिला यांना सरकारकडून नजरकैदेत ठेवण्याची भीती होती. त्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी संपूर्ण रात्र पक्षाच्या कार्यालयातच घालवली.
वायएस शर्मिलांचा काँग्रेस कार्यालयात मुक्काम
'चलो सचिवालय' आंदोलनापूर्वी अटक केली जाऊ नये म्हणून वायएस शर्मिला या रात्री विजयवाडा येथील काँग्रेस मुख्यालयात गेल्या आणि रात्रभर तिथेच थांबल्या. प्रथम बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.