‘बाकीचे 34 लोक कुठेय?’, सुषमा अंधारेंनी सोमय्यांनी गाठलं खिंडीत, इतिहासच काढला
sushma andhare press conference today: साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना इशारा दिला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांनी केलेल्या आरोपांचा इतिहासच काढला. प्रताप सरनाईकांपासून ते अनिल परबांपर्यंत सोमय्यांनी केलेल्या आरोपांबद्दल उलट सवाल करत सुषमा अंधारेंनी सोमय्यांना कात्रीत पकडलं. पुण्यात […]
ADVERTISEMENT

sushma andhare press conference today: साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना इशारा दिला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांनी केलेल्या आरोपांचा इतिहासच काढला. प्रताप सरनाईकांपासून ते अनिल परबांपर्यंत सोमय्यांनी केलेल्या आरोपांबद्दल उलट सवाल करत सुषमा अंधारेंनी सोमय्यांना कात्रीत पकडलं.
पुण्यात सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्या म्हणाल्या, “स्वच्छतादूत किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद असण्यापेक्षा नाक्यावर टपोरी पोरांनी बंबाट्या माराव्या अशी ती होती. ईडीच्या प्रमुखपदावर सोमय्यांची वर्णी लागली असावी, इतक्या आत्मविश्वासाने ते बोलत होते.”
पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, “9 पक्षप्रमुखांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. या देशाचा घटनात्मक प्रमुख म्हणून पंतप्रधानांकडे बघितले जाते आणि त्या खुर्चीमध्ये व्यक्ती कोण आहे, हे महत्त्वाचं नसतं. त्यामुळे ते पत्र लिहिलं होतं. त्यावर अपेक्षित असं होतं की, पंतप्रधानांनी त्यावर उत्तर द्यायला हवं होतं, कारण ते उत्तरदायी आहेत. ते भाजपचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहेत, असं असतानाही भाजपचे प्रवक्ते जास्त बोलायला लागले.”
सुषमा अंधारे यांनी भाजपला लक्ष्य केलं. त्या म्हणाल्या, “ज्यांच्यावर कारवाया सुरू आहेत, ते बिगर भाजपचे आहेत. 98 टक्के लोक बिगर भाजपचे आहेत. ज्या 2 टक्के भाजपशी संबंधित लोकांवर कारवाई होतेय, त्यांची उपयोगिता संपली असेल. जे भाजपमध्ये जातात, त्यांच्यावरच्या कारवाया थांबतात, मग ते काळ्याचं पांढरं करणारं मशीन आहे का?”
फडणवीसांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंचा बुध्यांक किती?: सुषमा अंधारे