आंधळं प्रेम पडलं महागात! क्रशला खूश करण्याच्या नादात नको ते करून बसली!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Teenager Girl Died Cause of Strict Diet :  ‘प्रेम’ ही गोष्ट अशी आहे जी कधी व्यक्तीच्या आयुष्यात आनंद घेऊन येते तर, कधी यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. प्रेमापोटी काहीजण तर कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतात. अशीच एक धक्कादायत घटना घडली आहे. (Teenager Girl try to impress her crush by loosing her Weight but Cause of Strict Diet She Died)

एका 15 वर्षांच्या मुलीने आपल्या क्रशला खूश करण्यासाठी सर्व हद्द पार केल्या. क्रशचे मन जिंकण्यासाठी, तरूणीने कडक डाएट करत चक्क 25 किलो वजन कमी केले. यानंतर वयोमानानुसार जितके वजन हवे त्यापेक्षाही निम्मे वजन तिचे झाले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना चीनमधील आहे. याबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीची उंची 5 फूट 4 इंच होती. 20 दिवस कोमात राहिल्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिचे वजन 25 किलोपर्यंत पोहोचले होते. सध्या सोशल मीडियावर तिचा आयसीयू बेडवर झोपून असलेला एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. जानेवारीत चिनी नववर्षाच्या तिसर्‍या दिवशी तिने पूर्णपणे लिक्वीड डाएट सुरू केले होते. वजन कमी करून क्रशचं मन जिंकणं हा या मुलीचा उद्देश होता. यामुळे तिच्या पालकांना खूप काळजी वाटायची. त्यांनी तिला समजावण्याचाही प्रयत्न केला पण तिने काही त्यांचं ऐकलं नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Pune Crime : महिनाभरापूर्वी होतं लग्न, पतीला शेतात घेऊन गेली अन् पत्नीने काढला काटा

50 दिवस कडक डाएट करून, क्रशचं मन जिंकण्याचा प्रयत्न!

मृत्यू झालेल्या मुलीला ज्यावेळी अशक्तपणा येऊ लागला त्यावेळी पालकांनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला असता तिने गाडीतून उडी मारली होती. मग कसे तरी ते तिला रुग्णालयात नेण्यात यशस्वी झाले, परंतु मुलीने स्वत: ला इजा करण्यास सुरुवात केली आणि रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मार्चपर्यंत ती फक्त लिक्वीडवरच होती. तिने 50 दिवस काहीही खाल्ले नाही. यामुळे तिला एनोरेक्सिया नर्व्होसाचा त्रास झाला. उपचार न मिळाल्याने आजार वाढत राहिला.

विवाहितेचा जंगलात सापडला मृतदेह! रक्तरंजित लव्हस्टोरी मोबाईलने…

शेवटी हतबल आई-वडिलांनी उपचार थांबवले कारण..

मार्चमध्ये मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. नंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी ती शुद्धीवर येईल की नाही हे डॉक्टरांना माहीत नव्हते. यानंतर अचानक ती कोमात गेली. डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितले की आता त्यांच्याकडे दोनच मार्ग आहेत, एकतर मुलीला कोमात राहू द्या किंवा या दुखण्यापासून मुक्त व्हा. पालकांनी खूप विचार केला आणि नंतर तिचे उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांच्या मुलीने जगाचा कायमचा निरोप घेतला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT