अपघात कसा झाला कळलं पाहिजे, कारण…; पत्नी ज्योती मेटेंनी व्यक्त केली शंका
मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचं काल अपघातात निधन झाले. काल त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज त्यांच्यावरती बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान त्यांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी व्हावी अशी मागणी विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. त्या बीडमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. काय म्हणाल्या ज्योती मेटे? विनायक मेटेंचा […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचं काल अपघातात निधन झाले. काल त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज त्यांच्यावरती बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान त्यांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी व्हावी अशी मागणी विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. त्या बीडमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
काय म्हणाल्या ज्योती मेटे?
विनायक मेटेंचा मृतदेहं सांगत होता की त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात आणंलं गेलं नाही. मी डॉक्टर असल्यानं माझ्या ते लक्षात आलं. अपघात झाल्यानंतर दीड ते दोन तासांनी त्यांना रुग्णालयात आणलं गेल्याचा गंभीर आरोप ज्योती मेटे यांनी केला आहे. नक्की काय झालं हे मला माहित नाही, माझं अजून ड्रायव्हरशीही बोलणं झालेलं नाही अशी प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली आहे.
विनायक मेटे अपघात : ट्रक चालकाला पालघर पोलिसांनी कसं शोधलं?, तो ट्रक कुठे गेला?
पुढे त्या म्हणाल्या ”मी चौकशीची मागणी करणार आहे. कारण यामध्ये काही फॉलप्ले नसला तरी मला अपघात कसा झाला हे कळण गरजेचं आहे. अपघात नेमका कसा घडला आणि आम्हाला किती वेळानंतर माहिती देण्यात आली या गोष्टींची आम्हाला माहिती मिळाली पाहिजे.” अँब्युलंसचा नंबर संगळ्यांकडे असतो, ड्रायव्हर फोन करु शकला असता, तो आम्हाला अपघाताचं नेमकं लोकेशन देत नव्हता असा धक्कादायक आरोप ज्योती मेटे यांनी केला आहे. त्याने जर आम्हाला लोकेशन दिले असते तर आम्ही वैद्यकीय मदत पाठवू शकलो असतो. त्यामुळे मी चौकशीची मागणी करणार असल्याचं ज्योती मेटे म्हणाल्या.