Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं विष? कराचीत घेतोय उपचार

दिव्येश सिंह

दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्याने याबद्दल माहिती दिली की, दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात.

ADVERTISEMENT

Underworld don Dawood Ibrahim admitted to hospital in Karachi
Underworld don Dawood Ibrahim admitted to hospital in Karachi
social share
google news

Dawood Ibrahim Hospitalized : मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदवर (dawood ibrahim news) कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विष दिलं गेल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर अनेक यूजर्संकडून केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विष प्राशन केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दाऊदसोबत काय घडलं?

दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्याने (dawood ibrahim gang member) याबद्दल माहिती दिली की, दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे. त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे आणि त्याला ज्या मजल्यावर दाखल केलेले आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात.

हेही वाचा >> “अदानींनी मिंधे, पवारांसह पन्नासएक आमदार-खासदारांना…”

विषबाधेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. मात्र, मुंबई पोलीस अधिकारी दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांकडून (पुतण्या अलिशा पारकर आणि साजिद वागळे) याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp