‘नायक नहीं खलनायक हूं…’ गाणं म्हणत दिराने वहिनीला संपवलं, कारण अनैतिक…
Murder: एका तरुणाने आपल्या वहिनीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना मध्यप्रदेशात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिरासह दोन जणांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

मुरार (मध्यप्रदेश): ‘नायक नही खलनायक हूँ मैं’ हे गाणं म्हणत दिराने (Brother-in-law) वहिनीची (Sister-in-law) चाकूने भोसकून हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दीर आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. आरोपीचा साथीदार हा अल्पवयीन असल्याचे समजते आहे. दुसरीकडे महिलेचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील कारवाई सुरू आहे. (a very shocking incident has happened in madhya pradesh where brother in law was brutally murdered sister in law)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील मुरार भागात राहणारी 35 वर्षीय महिला रेणू पाठक ही 17 एप्रिलपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी मुरार पोलिस ठाण्यात रेणू बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान लोकांनी पोलिसांना सांगितले की, रेणूला तिचा दीर श्याम पाठकसोबत शेवटचे पाहिले होते. श्याम हा ट्रक चालक म्हणून काम करतो.
दिराने दिली खुनाची कबुली
पोलिसांनी श्यामला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो रेणूबद्दल काहीही माहित नसल्याचे सांगत होता, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच रेणूचा खून केल्याची कबुली दिली. तसेच या खून प्रकरणात दोन मित्र एक राजू उर्फ कुअंर आणि एका अल्पवयीन मित्राचाही सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले. श्यामच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्याच्या अल्पवयीन साथीदाराला दतिया जिल्ह्यातील लॉन्च स्टेशन परिसरातून पकडले.
वहिनीला ट्रकमध्ये बसवलं अन्..
मुरार पोलीस ठाण्याचे प्रभारी संजीव नयन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू पाठक हिच्या हत्येचा आरोप हा दीर श्याम पाठकसह राजू आणि अन्य एक अल्पवयीन मुलावर आहे. रिमांडमध्ये श्याम आणि अल्पवयीन आरोपीने सांगितले की, 17 एप्रिलला आम्ही ट्रक घेऊन बडागाव येथे पोहोचलो. रेणू आमच्यासाठी जेवण घेऊन बडागावला आली होती.










