मृत्यूपूर्वी आकांक्षा पार्टीत खुश होती; नंतर असं काय झालं की तिने आत्महत्या केली?
Actress Akanksha Suicide: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आकांक्षाने वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आतापर्यंत तिने असे करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. शनिवारी 25 मार्चच्या रात्री आकांक्षा बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी हॉटेलमधून निघाली होती. […]
ADVERTISEMENT

Actress Akanksha Suicide: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आकांक्षाने वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आतापर्यंत तिने असे करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. शनिवारी 25 मार्चच्या रात्री आकांक्षा बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी हॉटेलमधून निघाली होती. रात्री उशिरा ती हॉटेलवर परतली. (Akanksha was making a reel at a birthday party before she suicide)
Akanksha Dubey: आकांक्षा शुटिंगसाठी वाराणसीला आली, नंतर हॉटेलमध्ये सापडला लटकलेला मृतदेह
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
आकांक्षा दुबे तिच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगच्या निमित्ताने वाराणसीला आली होती. आकांक्षा वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल सुमेंद्र रेसिडेन्सीमधील रुम नंबर 105 मध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बराच वेळ अभिनेत्रीची खोली उघडली नाही तेव्हा याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मास्टर चावीने खोली उघडली असता आकांक्षा दुबे हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
मेकअप-हेअर आर्टिस्टने मोठा खुलासा केला आहे
आकांक्षा दुबेचा मेकअप आर्टिस्ट राहुल आणि हेअर आर्टिस्ट रेखा मौर्य यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, शनिवार 25 मार्च रोजी संध्याकाळी आकांक्षा बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी हॉटेलमधून निघाली होती. तिला खूप खुश होती. तिला कसलेही टेन्शन नव्हते की तिला कोणाची भीतीही नव्हती.