Kalyan Crime : वय २२ अन् दाखल गुन्हे ८०! पोलिसांसाठी बनला मोस्ट वॉन्टेड आरोपी

मुंबई तक

At the age 22 He became the most wanted accused for the police उल्हासनगर : एका ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराला अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे. अब्दुल्ला संजय इराणी ऊर्फ सय्यद (२२ वर्षे) असं त्याचं नाव असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्याच्यावर तब्बल ८० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या रेकॉर्डवरील हा आरोपी होता. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

At the age 22 He became the most wanted accused for the police

उल्हासनगर : एका ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराला अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे. अब्दुल्ला संजय इराणी ऊर्फ सय्यद (२२ वर्षे) असं त्याचं नाव असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्याच्यावर तब्बल ८० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या रेकॉर्डवरील हा आरोपी होता. साखळी चोरी, मोबाईल फोन चोरी, वाहन चोरी, खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार संजय अशोक नैनवानी (वय ४६) हे १४ जानेवारीला अंबरनाथहून उल्हासनगरकडे दुचाकीने येत होते. त्याचवेळी अब्दुल्ला त्याच्या साथीदारासह संजय नैनवानी यांचा पाठलाग करु लागला अन् काही वेळातच त्यांना गुरुद्वारा कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर संजय नैनवानी यांनी अब्दुला आणि त्याच्या साथीदाराला पत्ता सांगितला. काही अंतर गेल्यानंतर अब्दुलाने जबरदस्तीने नैनवानी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचली आणि पोलिसात तक्रार नोंदवू नका म्हणून धमकी दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या नैनवानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार देत गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून शोध सुरू केला. तपासादरम्यान गुन्हेगार अब्दुल्ला संजय इराणी उर्फ ​​सय्यद हा परभणी शहरातील रहीम नगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला तिथूनच अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp