भिंतीवर डोकं आपटलं, तुटलेल्या बांगड्या तोंडात भरल्या, सासरच्यांकडून सुनेचा छळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

broke the bangles and put them in the women mouth hit his head on wall daughter-in-law harassment in buldhana
broke the bangles and put them in the women mouth hit his head on wall daughter-in-law harassment in buldhana
social share
google news

महाराष्ट्रात महिलांच्या हत्येच्या आणि छळाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. श्रद्धा वालकर (Shradda Walkar) प्रकरण असो, अथवा मिरा रोडमधील (Mira Road) सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) हत्याकांडाने या गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्या आहेत. आता अशीच घटना समोर आली आहे. या घटनेत तुटलेल्या बांगड्यांचा खच सुनेच्या तोंडात भरला, भिंतीवर डोकं आपटलं, त्यानंतर तिला बेदम मारहाण केल्याची घटना बुलढाण्यातून (Buldhana) समोर आली आहे. या प्रकरणी तरूणीच्या वडिलांनी आणि भावाने पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. (broke the bangles and put them in the women mouth hit his head on wall daughter-in-law harassment in buldhana)

मिळालेल्या माहितीनूसार, 25 वर्षाच्या पिडितेच लग्न डोनगावमध्ये राहणाऱ्या फिरोज खानशी झाले होते. या घटनेत पती फिरोज आणि तिच्या सासरचे पिडितेकडून सतत पैशाची मागणी करायचे. सासरच्यांच्या या मागणीवर पिडितेने एक-दोन वेळेस मदत केली होती. मात्र सासरच्यांची पैशांची मागणी वाढतच चालली होती. त्यानुसार सासरच्यांनी पुन्हा एकदा सुनेकडून पैशाची मागणी केली होती. मात्र यावेळेस पिडितेने सासरच्यांना नकार दिला होता. सासरच्या मागणीवर पिडिता म्हणते आता ती माहेरून पैसै आणू शकत नाही, याआधी दोन-तीन वेळा जे पैसै दिले होते, ते वड़िलांनी उधार घेऊन दिल्याचीही माहिती तिने दिली होती. सुनेच्या या उत्तरवरून सासरची मंडळी चांगलीच रागवली होती.

हे ही वाचा : Mira Road Murder : रेशन दुकानात भेट अन् क्रूर शेवट! झोप उडवणाऱ्या हत्येची Inside Story

सुनेच्या या उत्तराला रागावून सासूने बांगड्या तोडून तिच्या तोंडांत भरल्या.यानंतर पती फिरोजने तिचे डोकं भिंतीवर आपटले. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या या छळामुळे सून बेशुद्ध होऊन जमीनीवर कोसळली होती. या घटनेनंतर देखील सासरच्यांचा सुनेवर छळ सुरुच होता. सासरच्या मंडळींनी तिला तब्बल 8 दिवस घरात कैद करून ठेवले होते. या छळानंतर सासरच्यांनी सुनेच्या आई-वडिलांना तिला घरातून नेण्यास सांगितले होते. या दरम्यान सुनेचा भाऊ आणि तिचे वडिल ज्यावेळी मुलीला घ्यायला सासरी पोहोचले, त्यावेळेस तिची तब्येत बघून ते हैराण झाले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला बुलढाणा सरकारी रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी पिडितेला आय़सीयूत भरती करून तिच्यावर सध्या उपचार सूरू आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बुलढाणा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जालना जिल्ह्याच्या डोनगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आहे. आता डोनगाव पोलीस बुलढाण्यात जाऊन मेडिकल पुराव्याच्य़ा आधारावर पीडित कुटुबियांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास करणार आहे. या घटनेचा तपास पोलिस करतायत.

हे ही वाचा : किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT