Nargis Delhi : भयंकर! मावशीच्या मुलीचा रॉडने गार्डनमध्येच पाडला मुडदा; कारण…
दिल्लीतील मालवीय नगरमध्ये नर्गिस या तरुणीची हत्या करण्यात आली. लग्नाला नकार दिल्यानंतर इरफान या तरुणाने हत्या केली.
ADVERTISEMENT

Delhi murder case : दिल्लीतील मालवीय नगरमध्ये 25 वर्षीय नर्गिसची भरदिवसा लोखंडी रॉडने मारून मारून हत्या करण्यात आली. गॉर्डनमध्ये तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची झाडाझडती घेतली आणि जे दिसले, ते बघून पोलिसांच्याही पायाखालीच जमीन सरकरली. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात केली. (Nargis, 25, was beaten to death with an iron rod in broad daylight in Delhi’s Malviya Nagar.)
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी आणि मयत मुलगी हे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. इरफान आणि नर्गिसच्या आई सख्ख्या बहिणी आहेत. इरफान आणि नर्गिसचे लग्नही निश्चित झाले होते. पण, इरफानने काही काम करत नव्हता. त्यामुळे नर्गिसच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. सध्या इरफान फूड डिलिव्हरीचं काम करायचा. जे नर्गिसच्या घरच्यांना आवडत नव्हतं.
लग्नास नकार, रॉडने निर्घृण हल्ला
नर्गिस रोजच्याप्रमाणे स्टेनोच्या कोचिंगसाठी मालवीय नगरला यायची. शुक्रवारीही ती कोचिंगसाठी येथे पोहोचली. त्यानंतर इरफान तिला भेटला. बोलण्याच्या बहाण्याने इरफान नर्गिसला डीडीएच्या विजय मंडळ पार्कमध्ये घेऊन गेला. येथे त्याने नर्गिसशी लग्न करण्याचा विषय काढला. नर्गिसने इरफानशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. नर्गिसने दिलेल्या नकाराने इरफान संतापला.
वाचा >> Delhi Builder Wife Murder: जिममध्ये मैत्री, भररस्त्यातच हत्या; मोबाइलमध्ये खुनाचं ‘राज’?
इरफान आधीच सोबत रॉड घेऊन गेला होता. नर्गिसने नकार देताच त्याने लोखंडी रॉडने हल्ला करण्यास सुरुवात केली. इरफानने अचानक केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून नर्गिसला सावरताच आलं नाही आणि ती तशीच खाली कोसळली. नर्गिस जमिनीवर पडताच इरफानने घटनास्थळावरून पळ काढला.










