Crime : सनकी पित्याने दोन विवाहित मुलींची केली हत्या; पत्नी आणि नातू गंभीर जखमी
Crime news: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी, नातू आणि दोन विवाहित मुलींवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि नातवाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खून करण्यापूर्वी आरोपीने खोलीला कडी लावली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मानसिक आजारी असून किरकोळ कारणावरून भांडण झाल्यावर […]
ADVERTISEMENT

Crime news: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी, नातू आणि दोन विवाहित मुलींवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि नातवाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खून करण्यापूर्वी आरोपीने खोलीला कडी लावली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मानसिक आजारी असून किरकोळ कारणावरून भांडण झाल्यावर त्याने हे भयंकर पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. (Eccentric father murders two married daughters; Wife and grandson were also attacked)
Crime : मन सुन्न करणारी घटना! पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच झोपला पती…
वास्तविक, नागौर जिल्ह्यातील परबतसर पोलीस स्टेशन हद्दीतील दिल धानी गावात राहणाऱ्या मनारामने सोमवारी रात्री आपल्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत दोन्ही विवाहित मुलींचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पत्नी व नातू गंभीर झाले. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच परबतसर पोलीस ठाण्याचे अधिकारी विनोद कुमार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेशराम चौधरीही घटनास्थळी पोहोचले.
बाहेरून कडी लावली होती
मनराम यांचा मुलगा हजारी याने पोलिसांना सांगितले की, सोमवारी सायंकाळी मानसिक आजारी वडील मनाराम यांचा कुटुंबाशी किरकोळ कारणावरून वाद झाला. भांडण शांत झाल्यावर आम्ही सगळे झोपायला गेलो. मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. दोन्ही बहिणी, आई आणि बहिणीचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता.