गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी साताऱ्याजवळ अटक; काय आहे प्रकरण?

रिअल इस्टेट व्यवसायिकाला 20 कोटीची खंडणीची मागणीचं प्रकरण
gaja marne arrested by pune police
gaja marne arrested by pune police

-इम्तियाज मुजावर, सातारा

पुणे व तासगाव (जि. सांगली) येथील रिअल इस्टेट, शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करणार्‍या तरुण व्यवसायिकाला 10 जणांच्या टोळीनं कट रचून किडनॅप करत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात आठ दिवसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा जवळ वाई येथे पुणे पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणात साताऱ्यातील चौघांचा समावेश असून, गजा मारणेला अटक झाल्यानं साताऱ्यात त्याच्यावर अशी दुसऱ्यांदा कारवाई झाल्यानं त्याचे जिल्ह्यातील कनेक्शन पुन्हा समोर आलं आहे. हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किर्दत, पप्पू घोलप, गजा मारणे, रुपेश मारणे, अनोळखी महिला व अनोळखी तिघे ते चौघे (सर्व संशयित रा. पुणे, सातारा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गुंड गजा मारणेला अटक करण्यात आलेलं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार मूळ घटना 7 आक्टोबर 2022 रोजी घडलेली आहे. तक्रारदाराचा रिअल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. 2021 मध्ये त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून यातील सांगलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य संशयित हेमंत अण्णा पाटील हे संपर्कात आले.

शेअर ट्रेडिंगमध्ये 4 कोटी रुपये त्यांनी गुंतवण्यास नोव्हेंबर 2021 तयारी दर्शवली व त्यानुसार सर्व रक्कम तक्रारदाराला दिली. फेब्रुवारी 2022 मध्ये मात्र तक्रारदार पाटील यांना शेअर ट्रेडिंग व्यवसायात तोटा आल्याने हेमंत पाटील याचे 4 कोटी रुपये देणे शक्य झाले नाही. यानंतर मात्र संशयित हेमंत पाटील याने त्याबदल्यात वारंवार 20 कोटी रुपयांची मागणी केली.

या पैशांची वसुली करण्यासाठी गुंड गजा मारणे टोळी तक्रारदाराच्या मागे लागली. याप्रकरणी गेल्या आठवड्यात पुणे येथे गुन्हा दाखल झाल्यावर गुंड गजा मारणे पसार झाला होता. तसेच पुणे पोलिसांनी लगेच या गुन्ह्याला मोक्का लागला होता. मात्र गाज्या पुणे पोलिसांना सापडत नव्हता. अखेर रविवारी (१६ ऑक्टोबर) सायंकाळी तो सातारा पोलिसांना सापडला. गेल्या वर्षी देखील गज्या मेढा पोलिसांना सापडला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in