धक्कादायक! बालविवाहानंतर अल्पवयीन मुलीची प्रसूती, पतीवर बलात्काराचा गुन्हा

इम्तियाज मुजावर

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील साखरवाडीत अल्पवयीन (Minor Girl) मुलीच्या पतीवर (POCSO) पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी अल्पवयीन असून गेल्यावर्षी तिचा बालविवाह इंद्रजित जाधव (Indrajeet Jadhav) याच्यासोबत झाला होता. ही मुलगी त्याच्यापासून गर्भवती राहिली होती आणि नुकतीच सातारा जिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती झाली आहे. त्यानंतर सदरील मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आलं. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील साखरवाडीत अल्पवयीन (Minor Girl) मुलीच्या पतीवर (POCSO) पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी अल्पवयीन असून गेल्यावर्षी तिचा बालविवाह इंद्रजित जाधव (Indrajeet Jadhav) याच्यासोबत झाला होता. ही मुलगी त्याच्यापासून गर्भवती राहिली होती आणि नुकतीच सातारा जिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती झाली आहे. त्यानंतर सदरील मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आलं. (Getting married to a minor girl; A case of rape has been registered)

वयाचा दाखला मागितला आणि सगळं समोर आलं

फलटण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साखरवाडीतील इंद्रजीत जाधव याचा 4 एप्रिल 2022 रोजी अल्पवयीन मुलीशी प्रेम प्रकरणातून विवाह झाला होता. त्यानंतर ती गर्भवती झाली. त्यानंतर 14 मार्च रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती झाली. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना वयाचा दाखला मागितला असता मुलीचे वय प्रसूतीवेळी 18 वर्षाचे असल्याचे समोर आले.

Crime: दारु, पॉर्न Video अन् 32 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत नको ते केलं!

इंद्रजीत जाधव याच्यावर पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रसूतीवेळी तिचं वय 18 असल्याने तिचा बालविवाह झाल्याचं निष्पन्न झालं. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीबरोबर लैगिंक संबंध ठेवल्याने तिला गर्भधारणा झाली. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. एकूण हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी इंद्रजीत जाधव याच्यावर पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल होताच त्याला गजाआड केले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp