लाखोंच्या पगाराची ऑफर देऊन परदेशात डांबून ठेवलं; चित्तथरारकपणे सुटका, तुम्हालाही नोकरीची अशी ऑफर आलीय का?
उस्मानाबाद : गणेश जाधव उस्मानाबाद शहरातील समर्थ नगर भागात राहणारा कबीर शेख नोकरीसाठी कंबोडिया (Kambodiya) या देशात गेला होता. मात्र, तेथे त्याच्यासोबत असं काही घडलं जे वाचून तुमच्या देखील अंगाचा थरकाप उडेल. कबीरला कंबोडिया या देशात सुमारे वार्षिक 24000 हजार डॉलर एवढा पगार मिळेल, अशा प्रकारच्या जॉबची ऑफर आली. यानंतर जॉबवर रुजू होण्यासाठीची प्रकिया पार […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद : गणेश जाधव उस्मानाबाद शहरातील समर्थ नगर भागात राहणारा कबीर शेख नोकरीसाठी कंबोडिया (Kambodiya) या देशात गेला होता. मात्र, तेथे त्याच्यासोबत असं काही घडलं जे वाचून तुमच्या देखील अंगाचा थरकाप उडेल. कबीरला कंबोडिया या देशात सुमारे वार्षिक 24000 हजार डॉलर एवढा पगार मिळेल, अशा प्रकारच्या जॉबची ऑफर आली. यानंतर जॉबवर रुजू होण्यासाठीची प्रकिया पार पाडून कबीर पुण्याहून बंगळुरू, बंगळुरू ते बॅकांक आणि मग बँकाकहून कंबोडिया असा प्रवास करत या कंपनीत पोहोचला.
कंपनीत पोहचताच कबीरला धक्काच बसला
कबीर जेव्हा कंपनीच्या पत्त्यावर पोहोचला ,त्याला ज्या कंपनीची ऑफर आली होती तीथे गेल्यावर वास्तव कंपनी दुसरीच होती. त्याठिकाणची परस्थिती पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्याठिकाणी एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण होत होती. कर्मचाऱ्यांना मारहाण होताना पाहून कबीरला धक्काच बसला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे कबिरच्या लक्षात आले.
व्हाट्सएप्पच्या माध्यमाने मित्रांना सांगितली हकीकत