काकाच्या कृत्याने मुंबईत खळबळ! पुतणीवर अनैसर्गिक अत्याचार, दिले चटके
वडिलांच्या निधनानंतर काकासोबत राहत असलेल्या पुतणीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. काका गेल्या चार महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत होता.
ADVERTISEMENT

Mumbai Crime News Marathi : वरळीतील उच्चभ्रू भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्याच पुतणीला वासनेची शिकार बनवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून, 52 वर्षीय आरोपी फेब्रुवारीपासून पुतणीवर बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार करत होता, असंही समोर आलं आहे. काकाने पुतणीचे विवस्त्र फोटो काढले, त्याचबरोबर व्हिडीओ काढल्याचे चौकशीतून उघड झालं आहे.
वडिलांचे निधन झाले म्हणून ती काकाच्या आधाराने राहू लागली, पण काकानेच तिच्या अब्रुवर हात घातला. 52 वर्षीय आरोपीने पुतणीला चाकूचा धाक दाखवत अनैसर्गित अत्याचार केला. इतकंच नाही, तर विकृतीचा कळस गाठत तिचे विवस्त्र फोटो आणि व्हिडीओही काढले. त्याचबरोबर अंगावर जळता कापूर टाकून चटकेही दिल्याचे पीडितेने म्हटलं आहे.
वाचा >> सख्ख्या काकाने प्रायव्हेट पार्ट कापून केली पुतण्याची हत्या, तेही लग्नाच्या 2 दिवस आधी..
तरुणीचं लैंगिक शोषण, प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी 21 वर्षांची असून, ती एका महाविद्यालयात शिक्षण घेते. वडिलांच्या निधानानंतर ती आणि तिचा काका असे दोघेच घरात राहत होते. तक्रारीनुसार नराधम काकाने 15 मे रोजी तिला मारहाण केली. त्यानंतर तिचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढले आणि व्हिडीओही शूट केला.
वाचा >> धक्कायदायक घटना! धावत्या बसमध्ये तरूणीसोबत शरीरसंबंध ठेवले नंतर…
तीन महिन्यांपासून करत होता अत्याचार
नराधम आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने चाकूचा धाक दाखवून पुतणीवर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर अंगावर पेटता कापूर टाकून हाताला आणि पायाला चटकेही दिले, अशी आपबिती पीडितेने तक्रारीत सांगितली आहे.
वाचा >> Crime : दगडाने ठेचून मारण्यापूर्वी साक्षीसोबत कुणी ठेवले शारीरिक संबंध?
आरोपी काका 23 फेब्रुवारीपासून पुतणीवर अत्याचार करत होता. सततचे हे अत्याचार सहन न झाल्याने शनिवारी पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांना तिच्यासोबत होत असलेला प्रकाराबद्दल माहिती दिली. वरळी पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आणि विकृत काकाला अटक केली. वरळीतील उच्चभ्रू वसाहतीत ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.