Nitin Gadkari: “10 कोटी द्या, नाहीतर गडकरींचं कार्यालय उडवू”, नागपुरात खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nitin Gadkari news: केंद्रीय मंत्री (Union Minister) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं कार्यालय उडवून देण्याच्या धमकीने नागपुरात (Nagpur) मंगळवारी एकच खळबळ उडाली. दोन वेळा कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कार्यालय उडवून देऊ अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. (nitin gadkari gets threats by unknown person)

मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी ज्या व्यक्तीने नितीन गडकरी यांचं कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली होती. त्याच व्यक्तीने हे फोन केले असून, धमकी दिली आहे.

व्यक्तीने फोन करून धमकी दिल्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील व्यक्तीने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गडकरी यांच्या कार्यालयाच्या आणि घराच्या सुरक्षेत वाढ केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘त्या’ ऑफरवर नितीन गडकरी म्हणाले, ‘विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही’

गडकरींना धमकी, कॉल करणारा काय म्हणाला?

याप्रकरणी नागपूर पोलीस दलातील झोन 2 चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माध्यमांना माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात सकाळी 3 वाजता कॉल्स आले. ते कॉल्स एकाच व्यक्तीने केलेले आहेत. त्या व्यक्तीने जयेश पुजारी असं त्याचं नाव सांगितलं आहे, अशी माहिती मदने यांनी दिली.

ADVERTISEMENT

मागच्या वेळी कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नावही हेच होतं. कॉलवर त्याने सांगितलं की, मागच्या वेळी मी 100 कोटी मागितले होते. यावेळी 10 कोटी रुपये द्या. ज्या नंबरवरून कॉल्स आले, त्याची आम्ही पडताळणी करत आहोत, असंही मदने यांनी सांगितलं.

कोणताही प्रश्न आला तरीही महाराष्ट्राच्या मागे उभे राहणारे नेते म्हणजे नितीन गडकरी-शरद पवार

ADVERTISEMENT

प्राथमिक माहितीनुसार ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल्स आले, तो नंबर एका मुलीचा आहे. त्या मुलीसोबत संपर्क झाला आहे. ती मुलगी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करते. तिचा मित्र तुरुंगात आहे. जे कॉल्स केले गेले ते मुलीच्या मित्राने केले की, जयेश पुजारीने केले याचा आम्ही तपास करत आहोत. तपासातून याची माहिती समोर येईल, असं डीसीपी राहुल मदने यांनी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT