PFI Raids: NIAकडून कारवाईचा दुसरा राऊंड; पुणे, मुंबई, मराठवाड्यात अनेकांना घेतलं ताब्यात
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) कारवाईचा दुसरा राऊंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातून ६ पीएफआयच्या समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची टेरर फंडिंग प्रकरणी चौकशी होणार आहे. ही कारवाई एटीएस आणि एनआयएच्या समन्वयातून झाली आहे. संबंधित कारवाई पाकिस्तानच्या समर्थनार्थ लावलेल्या घोषणांबाबत नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. पुण्याबरोबरच मराठवाड्यातून २१ समर्थकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. […]
ADVERTISEMENT

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) कारवाईचा दुसरा राऊंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातून ६ पीएफआयच्या समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची टेरर फंडिंग प्रकरणी चौकशी होणार आहे. ही कारवाई एटीएस आणि एनआयएच्या समन्वयातून झाली आहे. संबंधित कारवाई पाकिस्तानच्या समर्थनार्थ लावलेल्या घोषणांबाबत नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. पुण्याबरोबरच मराठवाड्यातून २१ समर्थकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर ठाणे क्राईम ब्रँचने पीआयएफ संबंधी चार लोकांना ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये दोघांना मुंब्रा, एकाला कल्याण आणि एकाला भिवंडीमधून ताब्यात घेतले आहे.
सोलापूर, औरंगाबादमध्येही एनआयएची मोठी कारवाई
पुणे, मुंबई, ठाण्यापाठोपाठ सोलापूरमध्येही एनआयएनं कारवाई केली आहे. सोलापूरमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती पीएफआयशी संबंधित आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला NIA च्या टीमने दिल्लीला घेऊन गेल्याची सूत्रांची माहिती आहे. औरंबादमध्येही स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. औरंगाबादच्या पोलिसांनी १३ लोकांना ताब्यात घेतलं आहे.
पुणे महापालिकेने केली होती मान्यता रद्द
काही बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेने पीएफआयला एनजीओ म्हणून मान्यता दिली होती. परंतु ही मान्यता २०२०मध्ये रद्द करण्यात आली होती. २०२० मध्ये सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यावर, पुणे महापालिका आयुक्तांना PFIला दिलेली मान्यता रद्द केली होती.