हत्येच्या काही सेंकद आधी अतिक अहमदने कोणाला केला होता इशारा? Video व्हायरल

मुंबई तक

अतिक अहमदचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हत्येपूर्वी अतीक अहमद कोल्विन हॉस्पिटलच्या गेटवर पोलिस जीपमधून खाली उतरताना क्षणभर थांबल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

ADVERTISEMENT

A video of Atiq Ahmed is going viral. The video shows Atiq Ahmed getting out of a police jeep at the gate of Colvin Hospital and pausing for a moment before the murder.
A video of Atiq Ahmed is going viral. The video shows Atiq Ahmed getting out of a police jeep at the gate of Colvin Hospital and pausing for a moment before the murder.
social share
google news

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास आता 3 शूटर्सभोवती फिरत आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींची 4 दिवसांची कोठडी मागून घेतली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी तिन्ही आरोपींकडे 8 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत आरोपींनी काही महत्वाचे आणि मोठे खुलासेही केले असल्याची माहिती आहे. याच जबाबाच्या आधारावर एसआयटी तपास पुढे नेत आहे. पहिल्या दिवशी पहिल्या 24 तासात आरोपींनी काय सांगितले आणि तपास यंत्रणेची पुढील योजना काय आहे? हे सांगणारा खास रिपोर्ट.

5 दिवसांपूर्वी प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटल कॅम्पसमध्ये अतिक अहमदची हत्या करण्यात आली आहे. आता या हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रयागराज पोलिसांना खूप जोर लावावा लागत आहे.

अतीक अहमदच्या नावाने भाजपचा आमदार मागतोय मतं, म्हणतोय बघा…

3 शूटर्सनी 7 सेकंदात 18 गोळ्या झाडून अतिक आणि अशरफ यांची हत्या केली. हे तिघे कोण आहेत? त्यांचा हँडलर कोण आहे? अतिक आणि अशरफ यांची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? गेल्या 5 दिवसांपासून उत्तर प्रदेशचे पोलीस आणि एसआयटी हे प्रश्न सोडवत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे हत्येच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्याचे.

व्हायरल व्हिडिओचीही चौकशी सुरू आहे :

अतिक अहमदचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हत्येपूर्वी अतीक अहमद कोल्विन हॉस्पिटलच्या गेटवर पोलिस जीपमधून खाली उतरताना क्षणभर थांबल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. खाली उतरण्यापूर्वी आतिकचा एक पाय कारमध्ये होता. तो जीपच्या बाजूला उभा होता, तेवढ्यात त्याची नजर हॉस्पिटलकडे गेली. सुमारे चार सेकंद तो तिथे पाहत राहिला. यानंतर त्याने मानेनी इशारा केला आणि मग गाडीतून खाली उतरला. यानंतर तो हॉस्पिटलच्या आवारात पोहोचताच हल्लेखोरांनी मीडिया कर्मचारी असल्याचे भासवून गोळीबार केला. डोके हलवण्यापासून गोळीबारापर्यंतची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता प्रश्न असा आहे की ती व्यक्ती कोण होती, ज्याला पाहून अतिक अहमदने मान हलवली.

हे वाचलं का?

    follow whatsapp