Pune Crime : बंदुकीचा धाक अन् महिलेला खाऊ घातली स्मशानातील हाडांची पावडर

मुंबई तक

Pune crime news latest। अविवाहित महिलांचा (Married woman) सासरच्या मंडळीकडून वेगवेगळ्या प्रकारे छळ झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण पुण्यात (Pune) जे घडलंय ते ऐकून तुम्ही हादरून जालं. मूल होत नाही, तसेच घराची आर्थिक प्रगती होत नसल्यानं जाळलेल्या माणसांच्या हाडांची पावडर खायला दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी कुटुंबियांविरुद्ध सिंहगड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Pune crime news latest। अविवाहित महिलांचा (Married woman) सासरच्या मंडळीकडून वेगवेगळ्या प्रकारे छळ झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण पुण्यात (Pune) जे घडलंय ते ऐकून तुम्ही हादरून जालं. मूल होत नाही, तसेच घराची आर्थिक प्रगती होत नसल्यानं जाळलेल्या माणसांच्या हाडांची पावडर खायला दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी कुटुंबियांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात (sinhgad police station, pune) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तक्रारदार महिला कॉम्प्युटर इंजिनिअर असून, एप्रिल 2019 मध्ये महिलेचं जयेश पोकळे याच्यासोबत लग्न झाल होतं. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी महिलेचा छळ करण्यास सुरूवात केली. सासरच्या लोकांनी जयेशला सोन्याचे दागिने आणि गाडी घेण्यासाठी 10 लाख रुपये मागितले होते. मात्र, ते न दिल्यानं छळ सुरू केला.

काही दिवसांनंतर महिलेच्या घरी वाद सुरू झाले. घराची आर्थिक प्रगती व्हावी आणि मूल होत नाही म्हणून पोकळे कुटुंबियांनी अमावस्येला अघोरी कृत्य सुरू केलं. एका अमावस्येला रात्रीच्या वेळी दीर, जाऊ, पती व सासू-सासऱ्यांनी महिलेला स्मशानभूमीत नेलं.

तिथे जाळलेल्या प्रेताची काही हाड गोळा केली. राख मडक्यात भरली. त्यानंतर स्मशानभूमीतून आणलेली राख महिलेला पाण्यात टाकून प्यायला दिली. नंतर 11 फेब्रुवारी 2021 रोजी अमावस्येच्या दिवशी पूजा असल्याचं सांगून विवाहित महिलेला सासरचे लोक निगडी येथे घेऊन गेले.

हे वाचलं का?

    follow whatsapp