धक्कादायक! न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यात १९ वर्षीय तरूणाची आत्महत्या

वाचा सविस्तर बातमी नेमकी काय घडली पुण्यात घटना?
Shocking! A 19-year-old youth commits suicide in Pune after threatening to spread nude photos viral
Shocking! A 19-year-old youth commits suicide in Pune after threatening to spread nude photos viral

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सहज एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो.पण याच सोशल मीडियाचे जेवढे फायदे तेवढेच तोटे देखील आहेत.ते कधी आर्थिक,तर कधी ते जीवावर देखील बेतले आहेत. आता अशीच एक घटना पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या १९ वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाच्या जीवावर बेतली आहे. प्रीत यादव या तरुणी सोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. यानंतर त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली.या सततच्या त्रासाला कंटाळून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

शंतनू वाडकर या तरूणाची आत्महत्या

शंतनू वाडकर वय (19 रा. अनंत कुमार सोसायटी दत्तवाडी) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विजय खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,दत्तवाडी परिसरातील अनंत कुमार सोसायटीमध्ये शंतनू वाडकर हा १९ वर्षीय तरुण राहण्यास होता. तो सोशल मीडिया सक्रिय असायचा.

शंतनू आणि तरूणीची ओळख कशी झाली?

शंतनू याची इंस्टाग्रामवरील प्रीत यादव हा आयडी असलेल्या तरुणीशी ओळख झाली. तर त्याच दरम्यान प्रीत यादव हिने शंतनूला अर्धनग्न फोटो मागितल्यावर त्याने तिला शेअर केले. त्यानंतर मला पैसे दे,अन्यथा तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करेल,अशी धमकी प्रीत यादव हिने दिली. त्यावर त्याने ४ हजार ५०० रुपये ऑनलाईन दिले.त्यानंतर देखील सतत पैसे मागवू लागल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून शंतनूने २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या असलेल्या इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी मृत घोषित केले.या आत्महत्येचं कारण कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी आमच्याकडे तक्रार देताच गुन्हा केला आहे.आता या प्रकरणी प्रीत यादव हिचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

सेक्सॉर्टशन म्हणजे नेमकं काय?

सोशल मीडियाच्या मार्फत होणारा असा शोषणाचा प्रकार म्हणजे सेक्सटॉर्शन. हा गुन्हा सोशल मीडियाच्या विविध माध्यमांत घडतो. या गुन्ह्यात अनेक गुन्हेगार बनावट प्रोफाईल करतात. त्यानंतर ते अनोळखी लोकांशी ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. चांगली ओळख झाली की पीडितांना नग्न फोटो किंवा व्हीडिओ पाठवण्यासाठी प्रोत्साहित करतात. असं केलं नाही तर व्हीडिओ कॉल करून नग्न होण्यास सांगतात. हा फोन रेकॉर्ड केला जातो आणि मग ब्लॅकमेल केलं जातं. असा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास धमक्या दिल्या जातात.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in