पालघर : मुंबईत प्रेम… दिल्लीत गेल्यावर गर्लफ्रेंडचे केले तुकडे; तरुणीच्या हत्येचं कसं उलगडलं गूढ?
मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करत असताना दोघं प्रेमात पडले. नंतर दोघंही दिल्लीत गेले. दोघंही लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहायला लागले. दरम्यान, काही महिने लोटल्यानंतर श्रद्धा वालकरच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर प्रियकरांने श्रद्धासोबत केलेल्या क्रूरकृत्याची कबुली दिली. एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी अशी हादरवून टाकणारी घटना समोर आलीये. मे २०२२ मध्ये झालेल्या हत्येचा उलगडा […]
ADVERTISEMENT

मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करत असताना दोघं प्रेमात पडले. नंतर दोघंही दिल्लीत गेले. दोघंही लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहायला लागले. दरम्यान, काही महिने लोटल्यानंतर श्रद्धा वालकरच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर प्रियकरांने श्रद्धासोबत केलेल्या क्रूरकृत्याची कबुली दिली.
एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी अशी हादरवून टाकणारी घटना समोर आलीये. मे २०२२ मध्ये झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या आरोपी प्रियकराचं नाव आफताब अमीन पूनावाला असं आहे. हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आफताब अमीन पूनावाला याला अटक केलंय.
श्रद्धा वालकर आणि आफताब अमीन पूनावाला दोघेही पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. श्रद्धाचे वडील विकास मदान वालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा वालकर आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कामाला होती. तिथेच आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धाची भेट झाली.
श्रद्धा आणि आफताब एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर आफताब आणि श्रद्धा मुंबईतून दिल्लीत राहायला गेले. दिल्लीत राहायला गेल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावला. राग आल्यानं आफताबने श्रद्धाची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात नेऊन फेकले.