Shraddha Walkar Murder : श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या फ्लॅटवर आलेल्या तरुणीची ओळख पटली

मुंबई तक

आफताब अमीन पूनावाला… हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. त्याचं कारण म्हणजे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण. आफताब पूनावालाने लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या केली आणि तुकडे करून मृतदेह फेकला. या प्रकरणाचा तपास करत असतानाच पोलिसांना असं कळलं की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरात ठेवलेले असतानाच आफताब फ्लॅटवर एका तरुणीला घेऊन आला होता. त्या तरुणीची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आफताब अमीन पूनावाला… हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. त्याचं कारण म्हणजे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण. आफताब पूनावालाने लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या केली आणि तुकडे करून मृतदेह फेकला. या प्रकरणाचा तपास करत असतानाच पोलिसांना असं कळलं की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरात ठेवलेले असतानाच आफताब फ्लॅटवर एका तरुणीला घेऊन आला होता. त्या तरुणीची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना अखेर यश आलंय.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाविरोधात दिल्ली पोलीस सध्या पुरावे गोळा करताहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या केली. तिचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब पूनावालाने डेटिंग अॅपवरून पुन्हा डेटिंग सुरू केलं. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलेले असतानाच आफताब पूनावाला डेटिंग अॅपवर भेटलेल्या एका तरुणीला फ्लॅटवर घेऊन आला होता.

तर श्रद्धाचा जीव वाचला असता : तक्रार अर्ज समोर आल्यावर गृहमंत्री अन् पोलीस काय म्हणाले?

हे वाचलं का?

    follow whatsapp