कुऱ्हाडीने वार करून बापाला संपवलं, पोटचा मुलगाच का उठला जीवावर?
पत्नीने घटस्फोट घेतला, त्याचा राग मनात धरून मुलाने थेट स्वतःच्याच वडिलांचे कुऱ्हाडीने तुकडे केल्याची घटना पंजाबमध्ये घडली. घटस्फोट झाल्याने मानसिक ताणतणावाखाली असलेल्या मुलाने वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

Murder Case : पंजाबमधील संगरूरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. रात्री घरामध्ये झोपलेल्या वडिलांची त्यांच्या पोटाचे मुलाने हत्या (Father Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली आहे. त्या तरुणाचा अडीच महिन्यांपूर्वी पत्नीपासून घटस्फोट (Divorce) घेण्यात आला होता. त्याच कारणामुळे मानसिकरित्या अस्वस्थ होता. ही घटना संगरूच्या बटाडियाना गावामध्ये घडली आहे. वडिलांची हत्या झाल्यानंतर तिथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.
वडिलांचे तुकडे केले
ज्या तरुणाने वडिलांची हत्या केली आहे, त्याचे नाव मनप्रीत आहे. तो त्याच्या वडिलांबरोबर बतडियानामध्ये राहत होता. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मनप्रीतच्या घरातून जोरजोरात ओरडल्याचा आवाज आला. त्यामुळे तो आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्याच्या घरी गेले. तेव्हा चरणजीत सिंह यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहायला मिळाला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर चरणजीत यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार मनप्रीत विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे ही वाचा >> निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीश ‘आऊट’, विधेयकाला संसदेची मंजूरी
घटस्फोटामुळे तणाव
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनप्रीतचा अडीच महिन्याभरापूर्वी घटस्फोट झाला होता, त्यामुळे तो सतत चिंताग्रस्त दिसत होता. घटस्फोट झाल्यामुळे तो ताणतणावाखालीही होता, आणि त्यातून त्याने अनेकदा नातेवाईकांबरोबर वाद घातला होता.
मानसिक ताणतणाव
मनप्रीतने वडिलांची हत्या केल्यानंतर त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी पोलिसांना सांगण्यात आले की, मनप्रीतचा पत्नीपासून घटनस्फोट झाल्यापासून तो प्रचंड मानसिक ताणतणावाखाली होता. त्यावरून त्याच्या घरातही अनेकदा वाद झाले होते. त्या ताणतणावामुळेच त्याने रात्री दोन वाजता आपल्या वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.