अरे देवा! 14 वर्षाच्या विद्यार्थिनीने संपूर्ण शाळाच जाळली, कारण…
एका 14 वर्षाच्या संतप्त विद्यार्थीने अख्खी शाळा पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत आगीत होरपळून 20 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होते आहे.
ADVERTISEMENT
क्षुल्लक कारणावरून भांडण किंवा मारहाण झाल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. मात्र यापेक्षाही धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका 14 वर्षाच्या संतप्त विद्यार्थिनीने (Student) अख्खी शाळा (School fire) पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत आगीत होरपळून 20 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होते आहे. (14 year old girl set fire to school 20 killed after teacher snatched her mobile)
डेली स्टार रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, साऊथरण केले की अमेरीकेच्या गुयाना देशातील महदिया सेकेंडरी स्कुलच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या छोट्याशा लागलेल्या आगीने इतके रौद्ररूप धारण केल होत की काही मिनिटाचं होत्याच नव्हतं झालं होतं.संपूर्ण शाळा जळून खाक झाली होती. तसेच अग्निशामन दलाला देखील पोहोचण्यास खुपच उशीर झाल्याने तिथपर्यंत सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं.
हे ही वाचा : पाहुणा म्हणून आला अन् घरी परतलाच नाही, दोन सख्ख्या मावस भावांचा दुदैवी अंत
पोलिसांचा धक्कादायक खुलासा
राजधानी जॉर्ज टाऊनच्या 200 मीटर दुर सेंट्रल गुयाना माइनिंग टाऊनमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेक अनेक विद्यार्थी आणि शाळेचा स्टाफ अडकला होता. यामधील काही जणांना वाचवण्यात अग्निशामन दलाला यश आले होते. या घटनेत 20 जणांचा आगीत होरपळुन मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान या घटनेसंदर्भात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे आग लावणारं दुसरं तिसर कोणी नसुन शाळेचीच विद्यार्थीनी होती. ही घटना समोर येताच पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली होती. खरं तर विद्यार्थीनीचा मोबाईल शाळेच्या टीचरने जप्त केला होता. या घटनेवरून ती खुप रागावली होती. याच रागाच्या भरात तिने संतप्त होतं शाळेला आग लावून टाकली होती. या आगीत ही तरूणी देखील जखमी झाली होती. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान उपचारा नंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते.
गुयानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेराल्ड गौवियाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीचे वय अवघं 14 वर्ष आहे. ही मुलगी तिच्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती. त्यामुळे शाळा प्रशासनाने तिचा फोन हिसकावला होता.यामुळेच रागावलेल्या मुलीने संपूर्ण शाळा पेटवून दिली होती. या घटनेत नेमका कोणा कोणाचा मृत्यू झाला आहे, याचा तपास केला जात आहे. यासाठी फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरल आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लिव्ह इन रिलेशन, मृतदेहाचे तुकडे तुकडे अन् फ्रिज…श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती!
ADVERTISEMENT