पाहुणा म्हणून आला अन् घरी परतलाच नाही, दोन सख्ख्या मावस भावांचा दुदैवी अंत - Mumbai Tak - two brothers drowned in warna river walwa district tandulwadi village shocking crime story - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

पाहुणा म्हणून आला अन् घरी परतलाच नाही, दोन सख्ख्या मावस भावांचा दुदैवी अंत

Two brothers drowned in warna river : सांगली (Sangali News) जिल्ह्यातील वारणा नदीत (warna river) बुडून दोन सख्ख्या मावस भावांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अमोल प्रकाश सुतार ( वय 16) आणि रविराज उत्तम सुतार (वय 12 ) अशी मृत मुलांची नावे आहेत. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी (tandulwadi village) गावात ही घटना घडली आहे.या
Updated At: May 27, 2023 21:59 PM
two brothers drowned in warna river walwa district tandulwadi village

Two brothers drowned in warna river : सांगली (Sangali News) जिल्ह्यातील वारणा नदीत (warna river) बुडून दोन सख्ख्या मावस भावांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अमोल प्रकाश सुतार ( वय 16) आणि रविराज उत्तम सुतार (वय 12 ) अशी मृत मुलांची नावे आहेत. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी (tandulwadi village) गावात ही घटना घडली आहे.या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या घटनेतील एक तरूण गावात पाहूणा म्हणून आला होता, मात्र त्याचा दुदैवी अंत झाला. (two brothers drowned in warna river walwa district tandulwadi village shocking crime story)

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील मुळचा राजमाची गावचा रहिवासी असलेला रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे तांदुळवाडी गावात आला होता. आपला मावस भाऊ आल्याने अमोल सुतारला आनंद झाला होता. दोघांनी मजामस्ती करण्याचा बेत आखला होता. मात्र भलतंच घडलंय.

हे ही वाचा : लिव्ह इन रिलेशन, मृतदेहाचे तुकडे तुकडे अन् फ्रिज…श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती!

दोघेही वैरण काढायला नदीला जाऊया असे सांगून ते वारणा नदीकाठाला गेला होता. वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर दोघे भाऊ नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते.त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घडना घडली. या घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्यात कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्यासह पोलीस उप निरीक्षक विजय पाटील यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्सचे विनायक लांडगे व सुनील जाधव यांच्या टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. या टीमने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले होते.

रविराज सुतार सातवीत शिकत होता. त्याचे आई वडील रोजंदारी करून आपल्या मुलाला संगोपण करत होते. पण आज त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची व रविराज यांच्या घरी शोककळा पसरली आहे. तर अमोल प्रकाश सुतार हा आई वडीलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच होती. त्यांनी देखील त्यांचा मुलगा गमावल्याने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या दोन्ही सख्खा मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची नोंद कुरळप पोलिसात करण्यात आली आहे.या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हे ही वाचा : CCTV: शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला जागीच केलं ठार, उल्हासनगर हादरलं!

Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात चिकन खा अन् Weight Loss करा! कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी स्वत:साठी फक्त 5 मिनिटे काढा अन् दिवसाची सुरूवात ‘या’ 8 योगा स्टेप्सने करा! झटपट Weight Loss करायचंय? मग ‘हे’ 8 Snacks खाऊनच बघा… ‘गाव की गोरी बनली, शहर की छोरी’; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन अभिनेत्रीचा फुल ऑन फायर हॉट फिगर; कारण फॉलो करते ‘हा’ Diet Plan 162 किलोच्या IT इंजिनिअरने घटवलं 65 किलो वजन; कोणता सीक्रेट डाएट केला फॉलो? Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण?