Crime : नांदेड शहरात 22 वर्षीय तरुणाची हत्या; हे कारण येतंय समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nanded murder : नांदेड शहरात पूर्व वैमनस्यातून युवकाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री उशिरा सिडको (Cidco Area) परिसरातील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ घडली. राज प्रदीप सरपे (Raj pradip sarpe) असे मृत 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी राज सरपे (Attack with weapons) याला रस्त्यातच गाठून चाकूने जखमी केले. त्याच्या अंगावर चाकूचे वार करण्यात आले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. Brutally murder incident in nanded city

Crime: आईसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणांच्या कृत्यानं हादरलं नांदेड

राजला गोळी मारल्याची देखील चर्चा आहे. याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर काय झाले हे स्पष्ट होईल. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हल्लेखोरांच्या शोधासाठी पथक रवाना

मिळालेली अधिक माहिती अशी की, पाच-सहा महिन्यांपूर्वी हल्लेखोर आणि हल्ल्यात ठार झालेला तरुण यांच्यात वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला होता. पूर्वीच्याच वादातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

२५ तलवारींसह नांदेड पोलिसांनी केली दोन आरोपींना अटक

ADVERTISEMENT

मागील काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात मोठ्याप्रमाणात गॅंगवॉरच्या घटना घडत आहे. त्यामुळे त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. अशात आता नांदेड शहरामध्ये देखील तरुण मुलांमधील वाद आणि त्यातून खून झाल्याची घटना समोर आली आहे. हा खून मागील भांडणाच्या कुरापतीतून करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येणाऱ्या बाबीतून योग्य तपास केला जाईल, असं पोलीस अधीक्षक कृष्ण कोकाटे यांनी सांगितले. या घटनेमुळे नांदेड शहरात मात्र तणावाचे वातावरण आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT