'संतोष देशमुखांचा खून आरोपींनी एन्जॉय केला', सुदर्शन घुले कोर्टात.. नेमकं काय घडलं?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपीसह आणखी तीन आरोपींना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं. ज्यानंतर कोर्टाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला केली अटक
दोन्ही आरोपींना कोर्टाने सुनावली 14 दिवसांची कोठडी
आरोपींबाबत कोर्टात खळबळजनक आरोप
Sudharshan Ghule: ओमकार वाबळेसह, योगेश काशिद, स्वानंद बिक्कड, बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी एसआयटीने आता चक्र वेगाने फिरविण्यास सुरुवात केली असून पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना आज (4 जानेवारी) पुण्यातून अटक केली. तर सिद्धार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. ज्यानंतर कोर्टाने या तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (accused enjoyed the murder of santosh deshmukh what exactly happened in court 3 accused including sudarshan ghule were sent to 14 days police custody)
केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने या तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कुठली म्हणजेच 18 जानेवारी पर्यंतची ही पोलीस कोठडी असणार आहे सीआयडी आणि एसआयटीच्या चौकशीसाठी ही पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
'संतोष देशमुखांचा खून आरोपींनी एन्जॉय केला', सरकारी वकिलांच्या युक्तिवादाने खळबळ
या हत्या प्रकरणी युक्तिवाद करताना सरकारी वकील म्हणाले की, 'यांनी टोळीने गुन्हे केले आहेत. आजूबाजूच्या लोकांवर दहशत करतात. उद्योगधंदे आहे त्यांना त्रास देतात. यांच्यामुळे आणि या संघटनेमुळे जिल्ह्यात उद्योगांची वाढ झाली नाही. 9 तारखेपासून हे फरार होते. एकाने यांचं लोकेशन सांगितलं. दुसऱ्याने त्यासाठी मदत केली. हे सगळे क्रिमिनल conspiracy मध्ये येतात. यांच्यावर 120 ब लावलं पाहिजे.
हे ही वाचा>> Sudarshan Ghule Arrested : संतोष देशमुख प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला SIT कडून अटक
संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. हे टोळीने गुन्हे करणारी आरोपी आहेत. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे, जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांचा खून यांनी एन्जॉय केला आहे. या आरोपींना आता आळा घालणे गरजेचे आहे.










