भयंकर बदला अन् शारजाहचे तुरुंग : क्रिशन परेराची अटक ते सुटका, एका महिन्यात काय घडलं?

मुंबई तक

अभिनेत्री क्रिसन परेराची तब्बल एका महिन्यानंतर शारजाहच्या तुरुंगातून सुटका झाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात 29 मार्चला शारजाह विमानतळावर तिला अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : अभिनेत्री क्रिसन परेराची (Krishan Perera) तब्बल एका महिन्यानंतर शारजाहच्या तुरुंगातून सुटका झाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात 29 मार्चला शारजाह विमानतळावर तिला अटक करण्यात आली होती. मात्र, तपासांती क्रिशनला यात फसवले असल्याचे समोर आले आहे. क्रिशनचा ड्रग्जची तस्करी करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तिला याबद्दल काहीही माहिती नव्हते. त्यामुळे अखेर तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (Actress Krishan Perera has been released from Sharjah jail after a month.)

निर्दोष सुटल्यानंतर क्रिशन प्रचंड आनंदी आणि भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. क्रिशनने तुरुंगातून बाहेर येताच पहिल्यांदा आईला व्हिडीओ कॉल केला होता. यात ती आनंदी दिसत होती. पण रडतानाही दिसून आली. क्रिशनची आई प्रेमिला परेरा याही आनंदाने भारावून गेल्या होत्या. क्रिशनचा आणि तिच्या आईचा व्हिडीओ कॉलचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. क्रिशनचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी बराच संघर्ष करावा लागला होता. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांचीही मदत घेतली. अखेर या संघर्षाला यश येऊन तिची सुटका झाली आहे.

भयंकर बदल्याची ठरली शिकार :

क्रिशन पेरारला ड्रग्ज प्रकरणात अडकविल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने काही दिवसांपूर्वी 2 संशयितांना अटक केली आहे. रवी बोभाटे (35) आणि अँथनी पॉल (35) असे दोघांचे नाव आहे. हॉलिवूडमध्ये काम देण्याचा शब्द देऊन या दोघांनी क्रिशन परेराला शारजाहाला पाठवलं आणि जाताना एक ट्रॉफी दिली, याच ट्रॉफीमध्ये ड्रग्ज लपविले होते, असे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले होते. शारजामध्येही क्रिशनच्या हातातील एका ट्रॉफीमध्येच ड्रग्ज आढळून आले होते.

काय घडलं होतं क्रिशनसोबत?

याबाबत गुन्हे शाखेने दिलेली अधिक माहिती अशी की, अँथनी पॉल आणि रवी बोभाटे या दोघांनी मिळून क्रिशन परेराच्या आईचा बदला घेण्यासाठी या दोघांनी हा कट रचला. अँथनी पॉल काही वर्षांपूर्वी लॉकडाऊन दरम्यान क्रिशनच्या इमारतीत राहण्यासाठी गेला होता, त्यावेळी क्रिशन परेराच्या कुटुंबीयांच्या घरात असलेल्या कुत्र्याने अँथनीच्या पॉलचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका तुटलेल्या खुर्चीच्या मदतीने अँथनीने कुत्र्याला मारत दूर हटकण्याचा प्रयत्न केला. यावर क्रिशनची आई प्रमिला परेरा यांनी अँथनीचा पाणउतारा केला. यामुळे अँथनी दुखावला गेला. यानंतर त्याने रवी बोभाटेच्या सोबत मिळून हा कट रचला.

हे वाचलं का?

    follow whatsapp