मृत्यूपूर्वी आकांक्षा पार्टीत खुश होती; नंतर असं काय झालं की तिने आत्महत्या केली?
Actress Akanksha Suicide: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आकांक्षाने वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आतापर्यंत तिने असे करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. शनिवारी 25 मार्चच्या रात्री आकांक्षा बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी हॉटेलमधून निघाली होती. […]
ADVERTISEMENT
Actress Akanksha Suicide: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आकांक्षाने वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आतापर्यंत तिने असे करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. शनिवारी 25 मार्चच्या रात्री आकांक्षा बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी हॉटेलमधून निघाली होती. रात्री उशिरा ती हॉटेलवर परतली. (Akanksha was making a reel at a birthday party before she suicide)
ADVERTISEMENT
Akanksha Dubey: आकांक्षा शुटिंगसाठी वाराणसीला आली, नंतर हॉटेलमध्ये सापडला लटकलेला मृतदेह
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
आकांक्षा दुबे तिच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगच्या निमित्ताने वाराणसीला आली होती. आकांक्षा वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल सुमेंद्र रेसिडेन्सीमधील रुम नंबर 105 मध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बराच वेळ अभिनेत्रीची खोली उघडली नाही तेव्हा याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मास्टर चावीने खोली उघडली असता आकांक्षा दुबे हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
हे वाचलं का?
मेकअप-हेअर आर्टिस्टने मोठा खुलासा केला आहे
आकांक्षा दुबेचा मेकअप आर्टिस्ट राहुल आणि हेअर आर्टिस्ट रेखा मौर्य यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, शनिवार 25 मार्च रोजी संध्याकाळी आकांक्षा बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी हॉटेलमधून निघाली होती. तिला खूप खुश होती. तिला कसलेही टेन्शन नव्हते की तिला कोणाची भीतीही नव्हती.
ADVERTISEMENT
मात्र तिने एवढे मोठे पाऊल का उचलले हे कळले नाही. या घटनेमागील सत्य बाहेर यावे असे दोघांनी सांगितले. त्यांनी सांगितले की काल रात्री बर्थडे पार्टीत जाण्यापूर्वी आकांक्षा दुबेने तिचा एक रील इन्स्टाग्रामवर देखील टाकला होता. यामध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. पण असे होणार हे कोणालाच माहीत नव्हते. हेअरस्टायलिस्ट रेखा मौर्याने सांगितले की, आजपासून सुरू होणाऱ्या ‘लयक हूँ मैं नालायक नही’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी आकांक्षाला सकाळी 7 वाजता तयार व्हायचे होते.
ADVERTISEMENT
मात्र ती हॉटेलच्या खोलीतून बाहेर न आल्याने सकाळी दहाच्या सुमारास तिला बोलावण्यासाठी पाठवले. बराच वेळ खोलीचा दरवाजा ठोठावूनही तिने दरवाजा उघडला नाही. यानंतर, पुढच्या खोलीत थांबलेल्या दिग्दर्शकाने सांगितले की तिच्या खोलीच्या बाथरूममधून पाण्याचा आवाज येत आहे, कदाचित ती अंघोळ करत असेल, परंतु आकांक्षा इतका वेळ अंघोळ करत नाही. बऱ्याच वेळानंतर हॉटेलची मास्टर चावी घेऊन आकांक्षाची खोली उघडली असता तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला, असं ती म्हणाली.
Chandrashekhar Patil: शिवराज पाटील चाकूरकरांच्या चुलत भावाची गोळ्या झाडून आत्महत्या
पोलिसांनी माहिती दिली
याबाबत अधिक माहिती देताना वाराणसी पोलिस आयुक्तालयाचे एसीपी सारनाथ म्हणाले, ‘सध्या आकांक्षा दुबेच्या खोलीतून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. आजपासून सुरू होणाऱ्या तिच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात ती 22 मार्च रोजी तिच्या उर्वरित फिल्म युनिटसह वाराणसीला आली होती आणि हॉटेलमध्ये थांबली होती.
त्यांनी पुढे सांगितले की, ‘आकांक्षा दुबेचा मृतदेह पंख्याच्या सहाय्याने दोरीला लटकलेला होता. जे काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. आकांक्षा ही मूळची भदोही येथील चौरी येथील रहिवासी असून, सध्या ती कुटुंबासह मुंबईत राहात होती. तिच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा आत्महत्या म्हणून तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT