Rape Case: 80 वर्षाचा वासनांध वृद्ध, 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रोहित गोळे

ADVERTISEMENT

an 80 year old man raped an 11 year old minor girl uttar pradesh crime
an 80 year old man raped an 11 year old minor girl uttar pradesh crime
social share
google news

Minor Girl Rape Case: प्रयागराज: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा येथे एका 80 वर्षाच्या वृद्धाने 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धाने बलात्कार केल्यानंतर मुलीने प्रचंड आरडाओरडा केला. त्यामुळे तेथे आजूबाजूचे लोक पोहोचले. त्यांना पाहताच वृद्ध आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. हे प्रकरण मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी रोज त्या वृद्धाच्या घरी दूध आणण्यासाठी जात असे. हीच संधी साधत आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला. (an 80 year old man raped an 11 year old minor girl uttar pradesh crime )

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

दररोजप्रमाणे सोमवारीही अल्पवयीन मुलगी दूध घेण्यासाठी वृद्धाच्या घरी गेली. पण पुढे तिच्यासोबत काय होणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. मुलगी एकटी असल्याचे पाहून वृद्धाने तिला पकडले. त्यानंतर त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. यावेळी तरुणीने आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले. पण लोक येत असल्याचे पाहून वृद्धाने घटनास्थळावरून पळ काढला.

हे ही वाचा >> IIT Bombay: विद्यार्थ्याने खाल्लं Non-Veg, बसला हजारो रुपयांचा दणका

त्यानंतर लोकांनी मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. मुलीने घडलेली संपूर्ण घटना तिच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यामुळे कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपी वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. पोलिसांनी काही पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.

हे वाचलं का?

बांदा डीएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, त्यांना एका 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. लवकरच त्याला अटक करून कडक कारवाई केली जाईल.

हे ही वाचा >> Wagh Nakha : इतिहास बदलून टाकणारं छत्रपती शिवराजी महाराजांचं प्रतापगडवरचं युद्ध! वाघनखांची…

मात्र, या घटनेने संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपीला पकडून त्याला कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी पीडित मुलीचे कुटुंबीय आणि गावकरी करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT