धाराशिव : बलात्काराच्या आरोपीने जामिनावर सुटताच पुन्हा त्याच चिमुकलीवर केला अत्याचार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Raped on minor Girl : धाराशिव : जिल्ह्यातील एका गावात अतिशय चीड आणणारी घटना घडली आहे. लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये जामिनावर बाहेर असलेल्या 55 वर्षीय नराधमाने त्याच 8 वर्षीय चिमुकलीवर पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. ढोकी पोलिसात आरोपीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 वर्षांपूर्वी या आरोपीने गावातीलच 6 वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार केला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्याच मुलीचा लैंगिक अत्याचार केला. (As soon as the rape accused was released on bail, he raped the same child again)

ADVERTISEMENT

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार

या घटनेमुळे गावातील नागरिक संतप्त झाले असून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहीती अशी की 25 सप्टेंबर 2021 रोजी कसबे तडवळे येथिल मानाजी विठ्ठल होगले, वय 55 वर्ष याने गावातीलच एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक आत्याचार केला होता. याबाबत ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व तो कारागृहात होता. काही महिन्यापुर्वी सदरील गुन्हेगार हा वैद्यकीय कारणावस्त जामिनावर बाहेर आला होता.जामिनीवर सुटून आल्यानंतर देखिल या विकृत मनोवृत्ती असलेल्या नराधमाने आपली वृत्ती सोडली नाही.

Haridwar Crime: पाच वर्षांपासून सावत्र मुलीवर करत होता रेप; आईला कळताच..

शाळेच्या आवारात नेऊन लैंगिक अत्याचार

शुक्रवारी 7 एप्रिल रोजी चार वाजण्याच्या सुमारास पुर्वी पिडीत असलेल्या त्या लहान मुलीच्या घरी कोणी नाही हे पाहून तिच्या घरात घुसला. तिला आमिष दाखवुन गावातील शाळेच्या परिसरात घेऊन गेला व तेथे तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यादरम्यान तेथे पीडितेच्या भाऊ दाखल झाले. त्यांनी आरोपीच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका केली. याबाबात ढोकी पोलास ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन 376, 376 A, 376B, 376 (2) (n),बालकाचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा 2012 प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

घृणास्पद; कुत्र्यावर बलात्कार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

आरोपीला फाशीची शिक्षा द्या : नागरिक

या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली. हे प्रकरण गंभीर असून फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशा विकृत गुन्हगारांना कायदाच्या, पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. याआधी देखील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अशी घटना घडली होती. बलात्काराच्या केसमध्ये जामिनावर सुटलेल्या नराधम आरोपीने जामिनावर सुटून अल्पवयीन मुलीचा बलात्कार केला होता.

पुन्हा अशा किळसवाण्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या प्रकरणात आरोपीला अटक केली असून, योग्य तपास सुरु आहे. एकाच मुलीवर दुसऱ्यांदा रेप केल्याने या आरोपीवर 376 (2) (n) हे कलम लावले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस अधिक कडक पाऊलं उचलणार असल्याचं, उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.

ADVERTISEMENT

19 वर्षाच्या मुलीने केलेला 15 वर्षाच्या मुलावर बलात्कार, कोर्टाने सुनावली शिक्षा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT